आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

मेंगडेवाडी(ता.आंबेगाव) येथे गटारांची साफसफाई!

मेंगडेवाडी(ता.आंबेगाव) येथे गटारांची साफसफाई!!

मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे गटारांची साफसफाई केली. सध्या डेंगू, मलेरिया, टाईफाईड या रोगांचा परादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढला असून खोकला थंडी – ताप हे आजार देखील वाढत आहे या रोगांना वेळीच आळा घालण्यासाठी मेंगडेवाडी ग्रामपंचायतमार्फत गटारांची साफसफाई करण्यात आली. यावेळी तुंबलेल्या डबक्यातील सांडपाण्याचा प्रवाह पूर्ववत केला तसेच गावामध्ये धुरळणी करण्यात आली.
या वेळी सरपंच बाळासाहेब मेंगडे युवसेना जिल्हा समन्वयक सुनील गवारी, ग्रा. पं. सदस्य विशाल मेंगडे. अविनाश मेंगडे, दीपक गायकवाड, संदीप मेंगडे, ग्रा.पं. कर्मचारी नवनाथ चक्कर या वेळी उपस्थित होते. तसेच निरगुडसर ग्रमीण रुग्णालयाच्या परिचारिका कल्पना मेंगडे यांनी नागरिकांना आपल्या घराच्या सभोतालचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच सर्दी, खोकला, ताप आजार झाल्यास लगेचच दवाखान्यात उपचार घ्यावेत असे आव्हान करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.