आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

शिरूर,चाकण पाणीपुरवठा योजनांनासह जुन्नर पद्मावती तलाव व भुयारी गटार योजना मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमवेत शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली महत्त्वाची आढावा बैठक!!

शिरूर,चाकण पाणीपुरवठा योजनांनासह जुन्नर पद्मावती तलाव व भुयारी गटार योजना मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासमवेत शिवसेना उपनेते,मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी घेतली महत्त्वाची आढावा बैठक!!

शिरूर लोकसभा मतदारसंघातील नागरी हिताच्या दृष्टीने अतिशय गरजेच्या असलेल्या चाकण शहर व शिरूर शहर येथील पाणीपुरवठा योजनांचा व जुन्नर शहरातील पद्मावती तलाव आणि बंदिस्त गटार योजनांचा आढावा शिवसेना उपनेते, मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे व संबंधित अधिकाऱ्यांसोबत पुणे येथे घेत त्यांना अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या.

चाकण शहरामध्ये वाढत्या लोकसंख्येला पूरक असणारी सुधारित पाणी योजना नवीन दरसूचीनुसार रु.१६५ कोटी इतक्या रकमेची करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व त्रुटी व आवश्यक बाबी पूर्ण झाल्या असून पुढील तीन दिवसात या योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात सादर करण्यात येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान राज्यस्तरीय योजनेअंतर्गत ही योजना हाती घ्यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना मागील आठवड्यात भेटून आढळराव पाटील यांनी चर्चा केली होती. सध्या चाकण शहरांमध्ये १२ लाख लिटर पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून दिले जाते. मात्र हे पाणी अतिशय अपुरे पडत असून चाकण शहराची लोकसंख्या लक्षात घेऊन सदर नवीन योजना मार्गी लागेपर्यंत 25 लाख लिटर पाणी चाकण शहरास देण्यात यावे अशी मागणी यावेळी बैठकीत आढळराव पाटील यांनी केली. त्यावर मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे यांनी २० लाख लिटर पाणी चाकण शहराला देण्याचे मान्य करत तातडीने याबाबतचे आदेश काढण्याचे निर्देश दिले.

शिरूर शहरासाठी ७५ कोटी रुपयांची पाणी योजना सर्व प्रशासकीय बाबींची पूर्तता होऊन अंतिम टप्प्यात आली असून या योजनेसाठी घोड प्रकल्पावर ४.००४ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षण मंजूर करून घेण्यात आले आहे. या पाणी योजनेचा प्रस्ताव एमजीपी चे मुख्य अभियंता यांचेकडून मंत्रालयात मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे.

जुन्नर नगर परिषदेच्या पद्मावती तलावाच्या कामाचे 35 कोटींचे अंदाजपत्रक करण्यात आले असून सदर काम तांत्रिक मान्यतेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर करण्यात आले होते. सदर प्रस्तावात काही त्रुटी असल्याने या त्रुटी नगरपरिषदेकडून पूर्ण करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्रुटी पूर्तता झाल्यावर एमजीपीकडून सदर प्रस्तावास तांत्रिक मान्यता दिली जाणार आहे. पुढे हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उचित अभिप्रायासाठी पाठविण्यात येऊन त्यानंतर डीएमए व पुढे मंत्रालयात प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केला जाईल. पद्मावती तलावाचे खोलीकरण, रुंदीकरण होऊन पर्यटनदृष्ट्या तलाव परिसराचे सुशोभीकरण झाल्यानंतर येथील पाण्याचा वापर जुन्नर शहरासाठी होऊन पर्यटकांसाठी हे एक आकर्षण होणार आहे. या सह जुन्नर शहराकरता भुयारी गटार योजना राबविण्याच्या ३९.१२ कोटी रकमेच्या प्रस्तावास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून तांत्रिक मान्यता देण्यात येऊन हा प्रस्ताव दिनांक ५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी डीएमएकडे सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयास यावेळी दिल्या असून त्यानंतर डीएमएकडून सदर प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर होऊन नंतर मंत्रालयात बैठक होऊन त्यास अंतिम मान्यता मिळेल. ही सर्व प्रक्रिया येत्या महिन्याभरात पूर्ण करण्यासाठी मी आग्रही असून त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीच्या सूचना बैठकीत केल्या गेल्याचे आढळराव पाटील यांनी या वेळी सांगितले.

जुन्नर शहरातील सर्व भागात ही बंदिस्त गटार योजना राबविण्यात येणार असून त्यामुळे शहर स्वच्छ होण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच या योजनेमध्ये मल-निस्सारण प्रक्रिया शहराबाहेर ठेवण्यात आली असून सांडपाणी व्यवस्थापन पद्धतशीरपणे होऊन शहरात उघड्यावर पाणी साचणार नाही अशा प्रकारे नियोजन केले आहे.

सदर बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, चाकणचे मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, शिरूरच्या मुख्याधिकारी स्मिता काळे, जुन्नरचे मुख्याधिकारी संदीप भोळे, शिवसेना जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, आमदार सुरेश भाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन गोरे, शिवसेना जिल्हा संघटक अशोक भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

शिरूर, चाकण व जुन्नर नगरपरिषद हद्दीतील या एकूण ३१४ कोटी रुपयांच्या पाणी योजना व भुयारी गटार योजनामुळे या भागातील लाखो रहिवाशांची महत्त्वाची दैनंदिन गरज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाच्या माध्यमातून भागवली जाणार आहे अशी माहिती आढळराव पाटील यांनी दिली.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.