क्राईम स्टोरीताज्या घडामोडी

शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

शेेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरी प्रकरणी ओतूर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे यांनी दिली.
किसन चिमा मुकणे ( वय २२ वर्षे, रा. खिरेश्वर, ता. जुन्नर), व मोहम्मद हुसेन अब्दुल जब्बार शेख (वय ४५ वर्षे, रा. डिंगोरे, ता. जुन्नर ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती देताना श्री कांडगे म्हणाले की, ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दित दि.११ ते १२ मे २०२३ रोजी खिरेश्वर ( ता.जुन्नर ) येथील शेतकरी राजेंद्र मुरलीधर मेमाने व विकी जोशी यांच्या शेतजमीनी जवळील पिंपळगाव जोगा धरणाच्या पाणी साठ्यातील दोन विद्युत मोटारींची चोरी झाली होती, या बाबत राजेंद्र मेमाने यांनी ओतूर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करून, गुन्हा नोंदविण्यात आला होता. मेमाने व जोशी यांनी दिलेल्या तक्रारी वरून ओतूर पोलीस चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत असताना किसन मुकणे व मोहम्मद हुसेन शेख या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली, तपासा दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, आरोपींकडुन चोरीच्या दोन विद्युत मोटारी असा ४० हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक सचिन कांडगे, पोलीस हवालदार महेश पठारे, पोलीस नाईक नदीम तडवी, पोलीस नाईक संदिप लांडे, पोलीस कॉन्स्टेबल रोहीत बोंबले, होमगार्ड आशीष क्षिरसागर, विक्रम दुधवडे यांनी केली.
Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.