आरोग्य व शिक्षण

भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!!

भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 74 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा!!

वाघोली : भारतीय जैन संघटना शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प वाघोली येथे 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टेक महिंद्रा कंपनीचे सल्लागार श्री विल्सन डी व राहुल बेदमुथा, श्री चंद्रकांत पगारिया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय संविधानाचे वाचन करण्यात आले यानंतर एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे संचलन व स्कूल मधील विद्यार्थ्यांचे कवायतीचे प्रकार करण्यात आले. यावेळेस प्रबंध समितीचे अध्यक्ष विलास राठोड, महाविद्यालय विकास अध्यक्ष अरुणजी नहार, श्री अभय फुलपगर व श्री सुरेश साळुंके उपस्थित होते. यावेळेस बोलताना विल्सन डी यांनी आयटी क्षेत्रातील भारताची कामगिरी तसेच बेदमुथा यांनी भारताची इंटरनेट क्षेत्रात भरारी यासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमात राष्ट्रीय पातळीवरील बक्षीसे मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पाहुण्यांची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड यांनी करून दिली तर आभार विद्यालयाचे प्राचार्य संतोष भंडारी यांनी मांडले. या कार्यक्रमानंतर महाविद्यालयात वृक्षारोपण करण्यात आले तसेच प्रकल्पातील ओपन जिम चे उद्घाटन करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.