आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

निमगावसावा(ता.जुन्नर)येथे श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवाडी यांच्या वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा!!

प्रतिनिधी सुनिल गहिने
निमगावसावा – श्री पांडुरंग सार्वजनिक वाचनालय निमगाव सावा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बागवाडी आयोजित भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती 15 ऑक्टोबर 2023 हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री किसन नाथा गाडगे (माजी चेअरमन निमगाव सावा)हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. वाचनालयाचे अध्यक्ष श्री निजाम पटेल यांनी पुष्पहार अर्पण केला व पूजन केले. याप्रसंगी वाचनालयाचे सदस्य श्री संजय शेठ उनवणे व श्री सखाहरी खाडे यांनी भारतरत्नडॉ. अब्दुल कलाम यांच्या विषयी विद्यार्थ्यांना थोडक्यात माहिती सांगितली. त्यांनी कोणती पुस्तके लिहिली त्यांचे जीवन कार्य याविषयी अतिशय उत्कृष्ट अशी माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. त्यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी जीवनात गुरुजनांची व आई-वडिलांची आज्ञा पाळावी असे सांगितले. त्यानंतर रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धेमधील इयत्ता पहिली ते चौथी मधील प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. नंतर स्पर्धेतील सहभागी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा पॅडचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी उपस्थितामध्ये वाचनालयाचे अध्यक्ष श्री निजाम पटेल, उपाध्यक्ष श्री नवनाथ गाडगे, श्री तानाजी जाधव सर मुख्याध्यापक बागवाडी शाळा, सौ सुनीता औटी मॅडम ,श्री किसन नाथा गाडगे माजी चेअरमन,सदस्य श्री संजय उनवणे, श्री शंकर गाडगे, श्री सखाहरी महाराज खाडे, श्री दत्ता बेल्हेकर,ग्रंथपाल पंढरीनाथ घोडे,सौ अनिता गाडगे मॅडम, सौ तारा गाडगे इ. मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री तान्हाजी जाधव सर यांनी केले.आभार प्रदर्शन सौ सुनिता औटी मॅडम यांनी मानले व चहापानानंतर कार्यक्रम संपन्न झाला.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.