आरोग्य व शिक्षणसामाजिक

एक रुपयाचा पिक विमा भरणारे शेतकरी नुकसान भरपाई चे हक्कदार – अशोक भोर

एक रुपयाचा पिक विमा भरणारे शेतकरी नुकसान भरपाई चे हक्कदार – अशोक भोर

मंचर येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालय या ठिकाणी 24 डिसेंबर या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका व
अण्णासाहेब आवटे महाविद्यालय मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन प्रबोधनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलताना अशोक भोर म्हणाले की,एक रुपया देऊन शेतकरी पिक विमा संरक्षण घेत असतात. व्यक्तीने पैसे भरून विमा घेतलेला आहे.नुकसान झाल्यास ग्राहक आयोगात दावा दाखल करू शकतो.

2019 च्या कायद्यानुसार ग्राहक संरक्षणाची व्याप्ती खूप मोठ्या प्रमाणात वाढवली असून तो त्यातला छोटा आणि मोठ्यातला मोठा देखील ग्राहक आपल्या नुकसानीबाबत आयोगामध्ये तक्रारी दाखल करू शकतो. मग तो एक रुपया देऊन पिक विमा घेतलेला असो किंवा लाखो रुपये देऊन फ्लॅट खरेदी केलेला असो दोन्ही ही ग्राहकच असे मत व्यक्त केले.

यावेळी ग्राहक पंचायतीच्या महिला जिल्हाध्यक्षा नयनाताई आभाळे,ग्राहक पंचायतीचे तालुका अध्यक्ष देविदास काळे, प्राचार्य एन. एस.गायकवाड,पोलीस स्टेशनचे पी.आय. श्रीकांत कंकाळ,एकलहरे पोलीस पाटील सुमन फलके, महिला तालुका अध्यक्ष आशा थोरात,रामदास शेठ थोरात,सचिव संजय चिंचपुरे, मंचर पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. सुनील धनवे, पी.एस.आय.किरवे मॅडम,कॉन्स्टेबल माने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पी.एस.आय.धनवे साहेब म्हणाले की,विद्यार्थ्यांनी ऑनलाइन होणाऱ्या फसवणुकीपासून सावधान राहावे,विद्यार्थी आमचे बँकेत असणारे खाते सुरक्षित राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईल मधून येणारा ओटीपी कोणालाही देऊ नये किंवा बँकेच्या नावाने आलेले कॉल व त्यावर ती कोणतीही प्रतिक्रिया न देता डायरेक्ट बँकेची संपर्क साधावा असे मत पी.एस.आय सुनील धनवे यांनी व्यक्त केले.

यावेळी बोलताना जिल्हा महिला अध्यक्ष नयनाताई आभाळे म्हणाल्या की विद्यार्थी हा भविष्यातील नागरिक असून त्याची होणारी फसवणूक ही देशाला हानिकारक आहे.ग्राहक संरक्षणाचे धडे हे विद्यार्थी तसेच मिळणे गरजेचे आहे साठी ग्राहक पंचायत तिचे संस्थापक बिंदू माधव जोशी यांनी केली.अनेक वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या ग्राहक पंचायतीच्या लढ्यास आलेले यश म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा आणि हा कायदा विद्यार्थीदशेतच कळणे गरजेचे आहे. यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर होणारी फसवणूक टळेल.

यावेळी क्रांतीज्योती शिक्षण तज्ञ समाज सुधारक पहिली महिला शिक्षिका महिलाना शिक्षणाचा अधिकार देणाऱ्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या फोटोस अभिवादन ही करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागाचे राजेंद्र भोर यांनी केले तर आभार तालुका अध्यक्ष देविदास काळे यांनी मानले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.