आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात महाराष्ट्र दिन साजरा: महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवले यश!!

आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात महाराष्ट्र दिन साजरा: महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवले यश!!

शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित,आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आत्मा मालिक माउलींच्या कृपाशीर्वादाने, संत परिवाराच्या प्रेरणेने, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी साहेब, समस्त मंडळ विश्वस्त व संकुलाचे कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाने महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

मान्यवरांच्या हस्ते सुरूवातीला ध्वजारोहन व ध्वजवंदन झाले.यावेळी प्रमुख अतिथी संत भारत माता,संकुलाचे पदाधिकारी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अनंत गायकवाड,आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य पंकज बडगुजर, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल उपप्राचार्य जालिंदर हासे, वसतीगृह व्यवस्थापक शरद ब्राह्मणे आदीसह मान्यवर उस्थितीत होते. तसेच सूत्रसंचलन रत्ना व्यापारी व आभार उपप्राचार्य जालिंदर हासे यांनी केले. संगीत शिक्षक समाधान काटे, नरेंद्र गोसावी, एकनाथ गोधडे यांनी हुतात्म्यांना संगीत सेवेतून मानवंदना दिली.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. यात आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूलचे यंदा पाच विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले असुन यात इयत्ता पाचवीची कु अनुष्का हरिश्चंद्र भोये, कु प्रियंका अशोक रायात व कु.गार्गी हणमंत गलांडे तर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये स्वप्निल विलास गिम्भल व आविष्कार रणसिंग साळुंके या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन संकुलातील शिक्षक व स्पर्धा परीक्षा विभागाच्या प्रमुख सौ. श्रद्धा सानप,प्राचार्य पंकज बडगुजर यांनी केले. तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब विश्वस्त मंडळ व विश्वस्त तथा संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब, संकुलाचे शैक्षणिक संचालक तथा प्राचार्य डॉ डी. डी शिंदे व सहाय्यक व्यवस्थापक गुलाब हिरे, उल्हास पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले तसेच महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.