आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – वडगावपीर(ता.आंबेगाव) येथील पोखरकर मळा नं-2 येथे वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा!!

इम्पॅक्ट पंचनामाच्या बातमीचा – वडगावपीर(ता.आंबेगाव) येथील पोखरकर मळा नं-2 येथे वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी लावला पिंजरा!!

प्रतिनिधी – प्रतिक गोरडे

वडगावपीर ( ता.आंबेगाव) येथील पोखरकर मळा नंबर दोन येथे चार दिवसा पूर्वी बिबट्याने घराशेजारील घोठ्यात बिबट्याने शेळीवर हल्ला करून जखमी केले होते.या संदर्भात पंचनामाने वृत्तांकन प्रसिद्ध करून वनविभागाचे लक्ष वेधले होते.त्यामूळे वनविभागाने येथील बिबट्याचा वावर वाढल्याने बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने येथे पिंजरा आहे. यावेळी वनविभागाचे कर्मचारी बाळासाहेब आदक माजी उपसरपंच अण्णासाहेब पोखरकर,नवनाथ वाळुंज,मयुर पोखरकर,मच्छिंद्र पोखरकर,गणेश पोखरकर,स्वरूप पोखरकर,चांगदेव पोखरकर सुमित टेमगिरे व ग्रामस्थ उपस्थित होते. वनविभागाने येथे पिंजरा लावल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असले तरी ग्रामस्थांनी गाफील राहू नये असे आवाहन वनविभागाने केले आहे. _________________________

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.