आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीराजकीय

हिंगणगाव ते खामगाव टेक नदी जोडपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा!मा.खा.शिवाजीराव (दादा)आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश!!

हिंगणगाव ते खामगाव टेक नदी जोडपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा!मा.खा.शिवाजीराव (दादा)आढळराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश!!

हवेली तालुक्यात अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला हिंगणगाव ते खामगाव टेक हा मुळा मुठा नदीवरुन एकमेकांना जोडणारा पूल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आणण्यात यश आल्याची माहिती मा.खा.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे.

हिंगणगाव ते खामगाव टेक नदीजोड या पुलामुळे भविष्यात शिंदेवाडी, न्हावी सांडस, सांगवी सांडस या गावांतील ग्रामस्थांचे १० किलोमीटरवरील वळसा घालून पडणारे अंतर वाचणार आहे.या पुलाच्या मागणीसाठी हिंगणगाव, शिंदेवाडी या गावातील ग्रामस्थांनी शासन मागणी पूर्ण करीत नाही म्हणून मुळामुठा नदीत जलसमाधी आंदोलन करुन राज्य शासनाचे लक्ष वेधले होते. यावेळी आंदोलकांना पूल मंजूर करुन देण्याचे आश्वासन आढळराव दिले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन या बाबत आग्रही मागणी आढळराव पाटील यांनी केली होती. ‘पीएमआरडीए’ चे आयुक्त राहुल महिवाल यांना या कामाचा तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.

त्यानुसार हिंगणगाव ते खामगाव टेक पुलासाठी २५ कोटी रुपये व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळाला जोडणाऱ्या श्री क्षेत्र तुळापूर ते भावडी या रस्त्यासाठी १० कोटी रुपयांची तरतूद करण्यासंदर्भात पीएमआरडीए ला सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून तसा अहवाल शासन दरबारी सादर केला होता. सदर पूलाच्या कामासाठी पीएमआरडीए पथकाने आज आढळराव पाटील व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवार (दि. ८) रोजी अंतिम स्थळ पाहणी केली. यावेळी बांधकाम आणि रस्ते विभागाचे मुख्य अभियंता भालकर, कार्यकारी अभियंता कानगावे, कनिष्ठ अभियंता स्वरूप सिंग, श्रीरंगूप्पे, शिवसेना हवेली तालुकाप्रमुख विपुल शितोळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन पाटील, कृती समितीचे अध्यक्ष अंकुश कोतवाल, माजी सरपंच कुंडलिक थोरात, भवरापुरचे सरपंच सचिन सातव आदी मान्यवर उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.