आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील गवारी मळा, मेंगडेवाडी होणार राममय !!

आयोध्या येथे उभारण्यात आलेल्या प्रभू श्रीराम मंदिराच्या पार्श्वभूमीवर आंबेगाव तालुक्यातील गवारी मळा, मेंगडेवाडी होणार राममय !!
————————————————————

आंबेगाव तालुका वारकरी साहित्य परिषद व समस्त ग्रामस्थ गवारीमळा, मेंगडेवाडी यांच्या वतीने “प्रभू श्रीराम जन्मभूमी श्री.क्षेत्र अयोध्या” येथे होणाऱ्या नवीन मंदिराच्या कलशारोहण व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार रामायणाचार्य ह.भ.प.संतोष महाराज बढेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून मेंगडेवाडी, तालुका-आंबेगाव, जिल्हा-पुणे येथे संगीत तुलसी रामायण कथा यज्ञ सोहळा मकरसंक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सोमवार, दि.१५ जानेवारी २०२४ दररोज सायं. ६ ते ९ वाजे दरम्यान) व कथा सांगता : सोमवार, दि. २२ जानेवारी २०२४ काल्याच्या कीर्तनाने सकाळी ९ ते ११ वा. या वेळेत संपन्न होणार आहे.

भाविकांसाठी प्रशस्त बैठक व्यवस्था, भोजनव्यवस्था, पार्किंग व्यवस्था यासाठी गवारी मळा, मेंगडेवाडी येथे पाच एकर परिसरात भव्य मंडप उभारण्यात येत आहे. अवघे वातावरण राममय होण्यासाठी आंबेगाव तालुक्यात विविध ठिकाणी बोर्ड, स्वागत कमानी, भगवे झेंडे लावण्याचे काम प्रगतीपथात आहे. प्रशस्त मंडप उभारणी कामाला ह.भ.प.संतोष महाराज बढेकर, युवासेना कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले.

सदर कथा कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे सहकारमंत्री दिलीपराव वळसे पाटील, शिवसेना उपनेते, मा.खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, समस्त हिंदु आधाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, साधुसंत, वारकरी सांप्रदायातील महंत, श्रीराम भक्त, महिला भाविक व हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक व चाकण औद्योगिक नगरीतील प्रथितयश उद्योजक साईनाथ गवारी, शरद गवारी यांनी दिली. यावेळी मच्छिंद्र गवारी, रामदास गवारी, महेंद्र गवारी, मोहन गवारी, भरत गवारी, अरुण गवारी यांच्यासह स्थानिक नियोजक उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.