आरोग्य व शिक्षण

मा.खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मागणीला यश!! पिंपळगाव तर्फे महाळुंगे(ता.आंबेगाव) गावात केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून ९.२७ कोटी रुपये निधीतून जल जीवन योजनेअंतर्गत होणार नवीन पाणी पुरवठा योजना!!

आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव तर्फे महाळुंगे गावात केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून ९.२७ कोटी रुपये निधीतून जल जीवन योजनेअंतर्गत होणार नवीन पाणी पुरवठा योजना!!

शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव(खडकी) गावच्या पाणी पुरवठा योजनेसाठी ९ कोटी २७ लक्ष ७२ हजार ७०७ रुपये निधी मंजूर केला आहे. सदर योजनेची निविदा अधिकृतरित्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून या योजनेमुळे पिंपळगाव(खडकी) गावच्या सर्वांगीण विकासाला अधिक गतीने चालना मिळणार आहे.

यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेने ४.९९ कोटी रुपये रकमेचा प्रारूप आराखडा केला होता. वाढती लोकसंख्या विचारात घेता सदर योजनेत अनेक त्रुटी होत्या. पाणी पुरवठा योजना पाणी शुध्दीकरण प्रकल्पासह सौर ऊर्जेवर आधारित होणे आवश्यक असल्याने पाणी पुरवठा योजना पुणे जिल्हा परिषदेकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे हस्तांतरित होऊन नव्याने प्रारूप आराखडा तयार करून योजनेस मंजूरी मिळण्यासाठी मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील हे महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, अधीक्षक अभियंता अजित सिंह, कार्यकारी अभियंता रहाणे यांचेकडे सतत पाठपुरावा करत होते.

मागील महिन्यात झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पिंपळगाव(खडकी) येथील विविध विकासकामांना ३ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी मंजूर केला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत योजना करण्याची मुदत संपली असतानाही शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या आग्रहाखातर विशेष बाब म्हणून पिंपळगाव तर्फे महाळूंगे गावची पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

सदर प्रस्तावित योजना १५ लक्ष प्रतिदिन जल शुद्धीकरण यंत्रणेसह सौरऊर्जेवर कार्यान्वित होणार असून पाणी पुरवठा योजनेचा खर्च मर्यादित व ग्रामपंचायतीच्या आवाक्यात राहणार असल्याने गावातील पशुधन तसेच ग्रामस्थांना २४ तास प्रती माणसी ५५ लिटर स्वच्छ व फिल्टर पाणी उपलब्ध होणार आहे. पिंपळगाव(खडकी) घोडनदी लगत स्वतंत्र पाण्याची विहीर, जॅक वेलसह पंप हाऊस तसेच लिंबाचा मळा गायरान परिसरात १.७५ लक्ष लिटर, गव्हाळी मळा – राक्षे अरगडे मळा गायरान परिसरात ५० हजार लिटर व गावठाण परिसरात १.१० लक्ष लिटर क्षमतेच्या उंच पाण्याच्या टाक्या बांधण्यात येणार असून संपूर्ण गावात नळ जोडणीसाठी २० कि.मी. परिसरात अत्याधुनिक पाईपलाइनद्वारे जल मार्गिका करण्यात येणार असल्याची माहिती या पाणी पुरवठा योजनेसाठी प्रकर्षाने पाठपुरावा करणारे युवासेनेचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य सचिन बांगर यांनी दिली आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.