आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

यशस्वी होण्यासाठी स्पर्धात्मक संघर्ष अटळ!!

जेष्ठ कबड्डी पटू माजी कर्णधार शांताराम जाधव यांचा खेळाडूंना मोलाचा सल्ला!

यशस्वी होण्यासाठी स्पर्धात्मक संघर्ष अटळ!!

जेष्ठ कबड्डी पटू माजी कर्णधार शांताराम जाधव यांचा खेळाडूंना मोलाचा सल्ला!

प्रतिनिधी – प्रतिक गोरडे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड यांच्या वतीने समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी,बेल्हे (बांगरवाडी) येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरविभागीय क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाल्या.या स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी जेष्ठ कबड्डीपटू अर्जुन पुरस्कार विजेते व भारतीय संघांचे माजी कर्णधार शांताराम जाधव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शांताराम जाधव म्हणाले कि,स्पर्धा म्हणजे खेळाडूच्या आयुष्यातील पहिली पायरी.कोणतीही गोष्ट सुरु करायची असेल तर ती अखंड मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि निष्ठापूर्वक करावी लागते.त्यासाठी स्पर्धा ही फार महत्त्वाची गोष्ट आहे.माझ्यासारखा खेळाडू इंटर स्कूल पासून सुरुवात करून तो महाविद्यालयात खेळला त्यानंतर तो राज्यात खेळला,राज्यातून मला भारतीय संघांचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.अशा प्रकारच्या स्टेप्स,पायऱ्या तुम्हाला निर्माण कराव्या लागतील.त्यासाठी झगडावे लागेल,संघर्ष करावा लागेल तरच तुम्ही चांगले खेळाडू बनू शकता असा मोलाचा सल्ला यावेळी भारतीय संघांचे माजी कर्णधार शांतारामजी जाधव यांनी उपस्थित खेळाडूंना दिला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
कबड्डी (मुले)-सोलापुर
कबड्डी (मुली)-कोल्हापूर
खोखो (मुले)-कोल्हापूर
खोखो (मुली)-सोलापूर
हॉलीबॉल (मुले)-कोल्हापूर
हॉलिबॉल (मुली)-सोलापूर
बास्केटबॉल (मुले)-कोल्हापूर बास्केटबॉल (मुली)-जळगाव.
तसेच २४ वी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा नुकतीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे संपन्न झाली.त्यामध्ये सर्मथ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी,बेल्हे (बांगरवाडी) मधील तब्बल ८ खेळाडूंची निवड करण्यात आल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की व डॉ.संतोष घुले यांनी दिली.
निवड झालेल्या खेळाडूंची यादी पुढीलप्रमाणे:
वैभव तापकीर,अंकिता खेडकर यांची हॉलिबॉल साठी सोमनाथ नरसाळे,अनुजा तट्टू,किशोरी शिंगोटे यांची खो-खो साठी तर अनुष्का वाळकुंडे,साक्षी काकडे यांची कबड्डी साठी आणि शुभम घोलप याची बास्केटबॉल निवड करण्यात आली.
हे ८ खेळाडू बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या संबंधित खेळाच्या संघातून राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करतील.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,समर्थ इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की,डॉ.संतोष घुले यांनी अभिनंदन केले.सदर स्पर्धेच्या नियोजनामध्ये प्रा.एच पी नरसुडे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.सचिन दातखिळे,प्रा.राहुल लोखंडे,प्रा.नितीन महाले,प्रा.सचिन भालेकर,प्रा.ज्ञानेश्वर जाधव,प्रा.किरण वाघ,प्रा.नवनाथ निर्मल यांनी परिश्रम घेतले.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.