आरोग्य व शिक्षणराजकीय

छत्रपती शिवाजी महाराजांना स्फुर्तिस्थान मानून शिवसेना पक्षाची स्थापना – युवासेना जिल्हा समन्वयक सुनिल गवारी

छत्रपती शिवाजी महाराजांना स्फुर्तिस्थान मानून शिवसेना पक्षाची स्थापना – युवासेना जिल्हा समन्वयक सुनिल गवारी

मेंगडेवाडी (ता.आंबेगाव) येथे शिवसैनिकांनी शिवसेनेचा ५७ वा वर्धापण दिन उत्सहात साजरा केला याप्रसंगी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे व शिवसेना फलकाचे पूजन करण्यात आले.

स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना स्फुर्तिस्थान मानून शिवसेना पक्षाची स्थापना केली. मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली.
पक्षाची स्थापना केल्यापासून २०१२ पर्यंत बाळासाहेबांनी पक्षाची कमान सांभाळली. या कालावधीत पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंचं मोठं योगदान आहे.

शिवसेनेचा दबदबा राज्यात कायम आहे. लाखो शिवसैनिकांचा पाठींबा बाळासाहेबांना होता पण हा आधार टिकवून ठेवणं हे काम त्यांनी नेहमीच केलं.

शिवसेनेते छोटा-मोठा कार्यकर्त्याला शिवसैनिक म्हणून संबोधले जायचे.खासदार, आमदार, मंत्री, यांच्यापेक्षा माझा सैनिक मोठा आहे कारण यांना घडविण्यासाठी माझा शिवसैनिकच जिवाचे रान करत असतो असे बाळासाहेब कायम सांगायचे असे युवासेना जिल्हा समन्वयक सुनिल गवारी यांनी सांगितले.

यावेळी माजी सरपंच दिलीप रणपिसे, माजी पोलीस पाटील दशरथ मेंगडे,चेअरमन बाळासाहेब भोर, माजी सरपंच तुळशीराम गवारी उपाध्यक्ष श्रीगणेश देवस्थान ट्रस्ट भास्कर मेंगडे, माजी उपसरपंच अंकुश मेंगडे, सुर्यकांत मेंगडे, युवासेना शाखाप्रमुख गणेश मेंगडे,माजी ग्रा.पं.सदस्य रघुनाथ मेंगडे, अमोल मेंगडे दादाभाऊ मेंगडे आदी शिवसैनिक उपस्थितीत होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.