आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिष्यवृत्ती परीक्षेत शिंगवे(ता.आंबेगाव)शाळेचे घवघवीत यश..!!!

शिष्यवृत्ती परीक्षेत शिंगवे शाळेचे घवघवीत यश..!!!

शिष्यवृत्ती परीक्षा 2022 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवेने घवघवीत यश मिळविले असून २८० पेक्षा अधीक गुण मिळविलेले आंबेगाव तालुक्यातील सर्वाधीक ८ पैकी ५ विद्यार्थी शिंगवे शाळेचे असल्याची माहिती मुख्याध्यापक सुरेश लोहकरे यांनी दिली.

सार्थक पोंदे (२८६ गुण),ऋतुजा गोरडे (२८४ गुण),आर्या जगताप (२८४ गुण),कार्तिकी उनवणे (२८० गुण),आर्या वाव्हळ (२८० गुण) यांसह शाळेचे एकूण 32 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पाञ ठरले आहेत.याशिवाय नवोदय परीक्षेत देखील शिंगवे गावातील सर्वसामान्य कुटुंबातील सुकन्या आर्या एकनाथ जगताप हिची निवड झाल्याने कुटुंबात आणि गावामध्ये आनंदाचे वातावरण आहे.यशस्वी विद्यार्थ्यांस जालिंदर पोंदे सर,धनंजय पवार सर यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे भिमाशंकर कारखान्याचे संचालक नितीन वाव्हळ, भैरवनाथ पतसंस्थेचे संचालक श्री.हनुमंत तागड, राज्य पुरस्कारप्राप्त आदर्श शिक्षक रामभाऊ सातपुते गुरूजी,माजी मुख्याध्यापक खंडू लोखंडे गुरूजी,उपसरपंच संतोष वाव्हळ,चेअरमन बाळासाहेब गाढवे,पोलीस पाटील गणेश पंडीत,अध्यक्ष वैजनाथ येंधे,उपाध्यक्षा आशा तागड,ग्रा.पं.सदस्य हिरामन गोरडे,नविना गाढवे,माजी अध्यक्ष सचिन गोरडे,नविन सोनवणे,सुहास टाके अध्यक्ष आदर्श फाउंडेशन,उद्योजक लक्ष्मणशेठ गाढवे,दिलीप गोरडे सर,पञकार समीर गोरडे,शिक्षण विभाग आंबेगाव,व्यवस्थापन समिती,पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.