आरोग्य व शिक्षण

अरे बापरे…पिंपरखेड (ता.शिरूर) येथे पुन्हा एकदा बिबट्याचा महिलेवर हल्ला, हल्ल्यात महिला मृत्युमुखी!!

पिंपरखेड (ता.शिरूर) येथे पुन्हा एकदा बिबट्याचा महिलेवर हल्ला, हल्ल्यात महिला मृत्युमुखी!!

पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा परिसरात बुधवार दि.१ रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून सुनिल कुऱ्हाडे यांच्या ऊसाच्या शेतात ओढत नेऊन तिच्या शरीराचा गळ्याभोवतीचा काही भाग खाल्ल्याने सदर महिला मयत झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सदर महिला आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी , कळंब येथील रहिवासी असून तिचे पती जालिंदर मारुती जाधव (वय २६ वर्षे) व दिर विश्वास बाळू जाधव (वय ३८ वर्षे) असे तिघे मोटरसायकलवर फाकटे ते कळंब गावी जात असताना बोंबे मळा परिसरात लघुशंके करिता थांबले असता सदर महिलेच्या पती व दिराच्या समक्ष सदर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. आरडाओरडा झाल्यानंतर जमा झालेल्या नागरिकांनी शोध घेतला असता उसाचे शेतात पुजाचा मृतदेह मिळून आला.

घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी आणि पोलिस व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत प्रशासनाशी संपर्क साधला असता शिरूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने महिलेचा शोध घेऊन सदर मयत महिलेस शवविच्छेदनासाठी शिरूर येथे नेण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरू असल्याचे समजले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.