धामणी (ता-आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबाच्या पगडीला चांदीच्या चंद्रकोरीचा साज !!

खंडोबाच्या पगडीला
चांदीच्या चंद्रकोरीचा साज !….
धामणी ( ता- आंबेगाव) येथील कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरातील खंडोबाच्या पगडीला खंडोबाचे सेवेकरी वाघे मंडळीनी चांदीची चंद्रकोर बुधवारी पहाटेच्या पूजेच्या वेळी अर्पण केली असल्याचे खंडोबा देवस्थानाचे मुख्य पुजारी श्री दादाभाऊ भगत यांनी सांगितले.
मणीमल्लाची कथा घडल्यानंतर शेकडो वर्षानी भगवान शंकरानी पुन्हा मानव रुप धारण केले व येताना बेलभंडार,घोडा, कुत्रा,वाघ,बैल सिंह गायवासरु हे सर्व आपल्या बरोबर आणले त्या मानवरुपात भंडाराचे अनेक चमत्कार करुन महती वाढवली या मार्तड मल्हारी अवतार धारण करताना भगवान शंकराने आपल्या सर्व आभूषणाचा त्याग केला नंदीचा घोडा व्याघ्रभंर कातड्याची भंडार्या (भंडारा ठेवायची पिशवी) व अंगामध्ये बारबंदी व शिरस्थानी पगडी घातली कर्णकुंडले घातली त्याचप्रमाणे मागील शंकराच्या अवतारातील जटेमधील चंद्रकोर ही आपल्या या पगडीवर धारण करुन मल्हारी मार्तंडाने आपल्या भोळ्या भाबड्या भक्ताना दर्शन दिले समस्त भक्तजनांच्या मन: कामना पूर्ण करणारा खंडोबा देव अशीच त्यांची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे त्यामुळे खंडोबाच्या कोणत्याही स्थानी गेलेल्या भक्तांच्या भाळी भंडाराचा लेप असतो आणि त्याच्या मुखी सदोदीत जय मल्हार असा उद्दघोष सुरु असतो त्यामुळे खंडोबा आणि त्यांच्या भक्तातील नात्यातील वर्णन करणे अवघड असते अशी देवाच्या चंद्रकोरीची आख्यायिका असल्याचे सांगण्यात आले.
ही चांदीची चंद्रकोर शाहीर शिवाजी कोंडाजीबाबा जाधव वाघे यांचे स्मरणार्थ श्री दिनेश शिवाजी जाधव,सिताराम विठ्ठल जाधव ज्ञानेश्वर कोंडाजी जाधव यांच्या धामणीकर जागरण पार्टीने देवाला अर्पण केलेली आहे याशिवाय मंदिराच्या महाद्बाराशेजारी जय मल्हार या जयघोषाची पिवळी व भगवी पताका श्री गणेश शांताराम पंचरास यांनी अर्पण केली असल्याचे सेवेकरी भगत वाघे वीर मंडळीनी सांगितले.