आरोग्य व शिक्षण

वडगावपीर(ता.आंबेगाव) येथील आखाड्यात रंगल्या निकाली कुस्त्या!!

वडगावपीर येथील आखाड्यात निकाली कुस्त्या!!

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथे श्री पिरसाहेब देवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा रंगला.पुणे,मावळ,मुळशी,खेड,शिरूर,भोसरी, येथील नामवंत मल्लांनी हा आखाडा गाजविला कुस्त्या पाहाण्यासाठी परिसरातील कुस्ती शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.   या आखाड्यात ५१/ ते ५०००/ रुपयांपर्यंच्या कुस्त्या लावण्यात आल्या.यावेळी विजेत्यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.यावेळी अनेक मल्लांनी निकाली कुस्त्या केल्याने कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फिटले.या कुस्तीच्या आखाड्यात पायल शेळके व प्रेरणा शेळके (जारकरवाडी ) व शिरूर केसरी सिद्दी होळकर व श्रेया होळकर (जातेगाव ) या बहिनिंनी कुस्ती करताना प्रक्षकांची मने जिंकली.पंच म्हणून पै. गोरक्ष सासवडे,विजय आदक,पोपट आदक,रवि ढगे पाटील यांनी काम पाहिले.तर आखाड्याची व्यवस्था माजी सरपंच संजय पोखरकर, रमेश आदक,विश्वनाथ साबळे,रामदास पालेकर,माजी उपसरपंच रविंद्र गुळवे व अण्णा पोखरकर,दिलीप पोखरकर,पांडूरंग पोखरकर यांनी केली.यावेळी विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.