आरोग्य व शिक्षण
आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर, मांदळेवाडी येथे दि.१४ मार्च ते १६ मार्च २०२३ रोजी संपन्न होणार पिरसाहेब यात्रा महोत्सव!!
आंबेगाव तालुक्यातील वडगावपीर, मांदळेवाडी येथे दि.१४ मार्च ते १६ मार्च २०२३ रोजी संपन्न होणार पिरसाहेब यात्रा महोत्सव!!
हिंदू – मुस्लिम समाजाच्या एकीचे प्रतीक असणाऱ्या वडगावपीर, मांदळेवाडी येथील पिरसाहेबांचा वार्षिक यात्रा महोत्सव मंगळवार दिनांक १४ मार्च २०२३ ते गुरुवार दिनांक १६ मार्च २०२३ रोजी संपन्न होणार आल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
यात्रा महोत्सवाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने विवीध धार्मिक, सांस्कृतिक,मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. संदल, बैलगाडा शर्यती, शेरनी वाटप, दंडवते, तमाशा आदी कार्यक्रम यात्रा उत्सव काळात संपन्न होणार असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.