आरोग्य व शिक्षण

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबा देवाची यात्रा दि.५ ते ७ फेब्रुवारी रोजी होणार संपन्न!!

यात्रेच्या नियोजन संदर्भात यात्रा कमिटी, ग्रामस्थांची मिटिंग झाली संपन्न!!

श्री कुलस्वामी कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबा देवाची माघ पोर्णिमेला भरणारी प्रसिद्ध यात्रा ५/६/७ फेब्रुवारी रोजी ३ दिवस मोठय़ा उत्साहात धामणी, पहाडदरा, शिरदाळे, ज्ञानेश्वरवस्ती ग्रामस्थांच्या वतीने साजरी करण्यात येणार आहे.

आज २६ जानेवारी रोजी यात्रा कमेटी व ग्रामस्थांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी पारगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. लहु थाटे यांनी ग्रामस्थां सोबत नियोजनाची बैठक पार पडली. थाटे साहेबांनी बैलगाडा घाट व यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या वाहनांच्या पार्किंग ची व्यवस्था पाहुन काही सुचना केल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.