आरोग्य व शिक्षण

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथून त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळयाचे प्रस्थान!!

मांदळेवाडी (ता.आंबेगाव ) येथे त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळा प्रस्थान पूजन करताना ग्रामस्थ मान्यवर.

 

मांदळेवाडी-वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील भाविकांच्या सोमवार (दि-१६) रोजी त्र्यंबकेश्वर दिंडी सोहळ्याचे पूजन ग्रामपंचायतीच्या सदस्या ज्योती गोरडे, कुसुम आदक, सिता आदक, कल्पना मांदळे, लंका आदक, कमल मांदळे, लक्ष्मी मांदळे तसेच फकिरा आदक, संभाजी आदक, बबू आदक, उद्योजक विजय आदक, माऊली मांदळे, सुभाष बोत्रे, संतोष आदक, हनुमान आदक व ग्रामस्थांच्या हस्ते झाले व दिंडी सोहळ्याचे प्रस्थान झाले. हा दिंडी सोहळा शनिशिंगनापुर,देवगड, सप्तशृंगीदेवी मार्गे त्र्यंबकेश्वरला पोहचेल.तेथे पोहचल्यावर त्र्यंबकेश्वराचे दर्शन व ब्रम्हगिरी प्रदक्षिणा व नंतर परतीच्या प्रवासात नाशिक, लेण्याद्री,ओझर मार्गे हा दिंडी सोहळा मांदळेवाडी- वडगावपीर येथे पोहोचेल.

 

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.