आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे गावच्या कु.संकेत सुभाष काचोळे ची १९ जूनला कॅनडामध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवड!!

आंबेगाव गाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यातील डोंगरावर वसलेले जेमतेम चारशे ते पाचशे लोकसंख्या असलेले शिरदाळे हे छोटेसे गाव!!कायमस्वरूपी दुष्काळ तसेच खडक माळरानावर वसलेले गाव खरी अशी ओळख असणारे हे गाव आहे. परंतु गावच्या दृष्टीने तसेच गावचा खऱ्या अर्थाने नावलौकिक वाढवणारी गोष्ट आज घडली आहे…शिरदाळे येथील युवक कु.संकेत सुभाष काचोळे हा युवक चार वर्षांपूर्वी लंडन येथील किंग्स्टंन विद्यापीठामध्ये कृत्रिम मानवी मेंदू तयार करणे या महत्वपूर्ण विषयावरती संशोधन करण्यासाठी गेला होता. गेल्या चार वर्षापासून त्याने अगदी अथक पूर्ण आणि मेहनतीने हे संशोधन केले आहे. त्याच्या या मेहनीतीला खऱ्या अर्थाने आज यश मिळाले असून येत्या 19 जूनला कॅनडामध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी निवडले असून लवकरच जागतिक विद्वानांसमोर संशोधन सादर करण्याची संधी त्याला भेटणार आहे. संकेतचे संपूर्ण शालेय शिक्षण निगडी प्राधिकरण शिक्षण संस्थेत झाले असले तरी त्याने आपली गावाशी असणारी नाळ कायम घट्ट ठेवलेले आहे, संकेत चे वडील श्री सुभाष शेठ काचोळे हे एक यशस्वी उद्योजक असून त्यांनी शिरदाळे गावचे पाच वर्ष यशस्वी सरपंच भूषवलेले आहे गावचा चेहरा मोहरा बदलण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे..
संपूर्ण शिरदाळे ग्रामस्थंच्या वतीने खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा..

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.