आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन करावे – कृषिदूत

शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन करावे – कृषिदूत

महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत, डॉ. पद्मभूषण वसंदादा पाटील कृषी विद्यालय, आंबी येथील कृषीच्या विद्यार्थ्यांनी लांडेवाडी येथे ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत गावातील शेतकऱ्यांना एकात्मिक कीड रोग व्यवस्थापन बद्दल चर्चासत्र आयोजित केले होते.

त्यात त्यांनी विविध प्रकारच्या कीड व रोग व्यवस्थापण बद्दल माहिती दिली त्यात त्यांनी पारंपरिक पद्धतीने, यांत्रिक , जैविक आणि रासायनिक खते व्यवस्थापना बद्दल शेतकऱ्यांना त्याचे फायदे आणि कसं वापरायचं या बाबत माहिती दिली आणि त्यांना एकात्मिक कीड रोग व्यव्थापन वापरण्यास प्रोत्साहित केले.

त्याचप्रमाणे कृषी दूतांनी चर्चासत्रात यांत्रिक सापळे आणि जैविक कीटक ( मित्र कीटक) हे प्रत्यक्षात दाखऊन त्यांना माहिती दिली आणि रासायनिक खते व औषधे यांचे होणारे नुकसान शेतकऱ्यास पटवून दिले व त्यांचा कमी वापर करायला सांगितलं.

या कार्यक्रमाचे नियोजन कृषीदुत आदित्य वाडीभस्मे, ऋषिकेश सोनावळे,शुभम यादव , ऋषिकेश शितोळे, हर्ष बोरचटे यांनी केले तसेच वनस्पती रोगविज्ञान विभागाचे प्रा. सौ. चेतना पिंगळे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.