आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

माध्यमिक विद्यालय खडकवाडी(ता.आंबेगाव)येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा!!

माध्यमिक विद्यालय खडकवाडी येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा!!

दिनांक 6/10/2023 रोजी माध्यमिक विद्यालय खडकवाडी येथे वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर अंतर्गत मा.वनपरिक्षेत्रअधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल सोनल भालेराव यांनी त्यांची वन परिमंडळ धामणी टीम व रेस्क्यू मेंबर तसेच कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील राष्ट्रीय सेना योजनातील विद्यार्थी यांच्या समवेत खडकवाडी माध्यमिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह अतिशय उत्साहात साजरा केला.

दरवर्षी एक ते सात ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीवांबद्दल वनविभागामार्फत जनजागृती केली जाते. त्या अनुषंगाने वनपाल सोनल भालेराव यांनी त्यांची संपूर्ण टीम व रेस्क्यू मेंबर यांचे सहित खडकवाडी येथे माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण पर्यावरण तसेच बिबट व मानव जीवन, बिबट्यांविषयी कशी खबरदारी घ्यावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना मी बिबट्या बोलतोय हा बिबट्या विषयीचा माहितीपट दाखवण्यात आला. त्यानंतर कला,वाणिज्य,विज्ञान धरणगाव येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षण याविषयी पथनाट्य सादर केले.

वनपाल सोनल भालेराव यांनी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन केले असून सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे. या कार्यक्रमात खडकवाडी गावचे मा. सरपंच अनिल डोके यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच सदर कार्यक्रमाला गुलाब वाळुंज, उपसरपंच एकनाथ सु्क्रे,दिलिप डोके, वैभव सुक्रे,किरण वाळुंज,वनपाल सोनल भालेराव,वनसेवक दिलीप वाघ, बाळासाहेब आदक, रेस्क्यू टीम मेंबर सोन्या बापू लंके, कल्पेश बडेकर, गोरक्ष सिनलकर, ऋषिकेश कोकणे, विनोद तांबे तसेच शाळेतील शिक्षक वृंद नवल पगार ,कृष्णाजी ढवळे,रामदास रोडे, मुख्याध्यापक लहाणभाऊ घुले उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.