अर्थकारणसामाजिक

भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन !!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५-२६ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन जोडणीचे कामास मिल रोलर पूजन सोमवार (ता. २) कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांच्या हस्ते करुन सुरुवात करण्यात आली.
मिल रोलर पूजन समारंभास कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, बाजीराव बारवे, सिताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, संचालिका पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, डिस्टीलरी मॅनेजर इस्माईल इनामदार, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, वाहन प्रमुख किरण शिंदे आदी उपस्थित होते.
अधिक माहिती देताना कारखान्याचे चेअरमन बेंडे म्हणाले की, कारखान्याच्या सन २०२५-२६ गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु झाली आहे. येत्या गळीत हंगामाकरीता कारखान्यातील मशिनरी ओव्हरऑयलिंग, रिपेअरींग कामे सुरु केली असून सदरची कामे दर्जेदार व वेळेत पुर्ण करुन ऑक्टोबर महिन्यात प्लॅन्ट गाळपासाठी सज्ज राहण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. कारखान्याचे संस्थापक – संचालक तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये मागील गळीत हंगामाप्रमाणेच ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट्य असून त्यादृष्टीने वेळेत गाळप पूर्ण होण्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोड वाहतूक वाहन टोळी, ट्रॅक्टर टायरगाडी, टायरबैलगाडी व ऊस तोडणी यंत्राचे करार लवकरच सुरु करणार आहोत. मागील हंगामाप्रमाणे येणारा गाळप हंगाम असल्याने ऊस उत्पादक, तोडणी वाहतुक कंत्राटदार, तोडणी मजुर, अधिकारी व कर्मचारी यांनी हंगाम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य करावे. सभासद व ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस आपल्याच कारखान्यास गळीतास द्यावा असे आवाहन व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.

दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु., ता. आंबेगाव येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात रोलर पुजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.