आंबेगाव तालुक्यातील प्रगती विद्यालय वडगावपीर येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा!!

आंबेगाव तालुक्यातील प्रगती विद्यालय वडगावपीर येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा!!
दिनांक 6/10/2023 रोजी प्रगती विद्यालय वडगावपीर येथे वनपरिक्षेत्र कार्यालय मंचर अंतर्गत मा.वनपरिक्षेत्रअधिकारी स्मिता राजहंस यांच्या मार्गदर्शनानुसार वनपाल सोनल भालेराव यांनी त्यांची वनपरिमंडळ धामणी टीम व रेस्क्यू मेंबर तसेच कला,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालय नारायणगाव येथील राष्ट्रीय सेना योजनातील विद्यार्थी यांच्या समवेत वडगावपीर प्रगती विद्यालयात वन्यजीव सप्ताह अतिशय उत्साहात साजरा केला.दरवर्षी 1ते 7ऑक्टोबर या कालावधीमध्ये वन्यजीवांबद्दल वनविभागामार्फत जनजागृती केली जाते त्या अनुषंगाने वनपाल सोनल भालेराव यांनी त्यांची संपूर्ण टीम व रेस्क्यू मेंबर यांचे सहित वडगावपीर येथे माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वन्यजीव संरक्षण पर्यावरण तसेच बिबट व मानव जीवन, बिबट्यांविषयी कशी खबरदारी घ्यावी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना ,”मी बिबट्या बोलतोय “हा बिबट्या विषयीचा माहितीपट दाखवण्यात आला .त्यानंतर कला,वाणिज्य, विज्ञान नारायणगाव येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षण याविषयी अतिशय सुंदर पथनाट्य सादर केले वनपाल सोनल भालेराव यांनी चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धांचे आयोजन केले असून सदर स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे तसेच सदर कार्यक्रमाला उपस्थित वनपाल धामणी सोनल भालेराव वनसेवक दिलीप वाघ,बाळासाहेब आदक रेस्क्यू टीम मेंबर सोन्या बापू लंके, कल्पेश बढेकर ,गोरक्ष सिनलकर ऋषिकेश कोकणे ,विनोद तांबे तसेच माजी सरपंच संजय पोखरकर माजी उपसरपंच अण्णासाहेब पोखरकर शाळा व्यवस्थापन समिती उप अध्यक्ष रमेश रोकडे ,ग्रामस्थ ,प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री टाव्हरे सर व स्टाफ ,प्रगती विद्यालय वडगावपीर मुख्याध्यापक सौ भालेराव मॅडम व स्टाफ , आदी उपस्थित होते