आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रराजकीय

भैरवनाथ पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी!!!

अतिवृष्टीमुळे १२०० नुकसानग्रस्त अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून दिवाळी सणानिमित्त किराणा साहित्याचे करणार मोफत वितरण!!

 

भैरवनाथ पतसंस्थेने जपली सामाजिक बांधिलकी!!!

अतिवृष्टीमुळे १२०० नुकसानग्रस्त अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून दिवाळी सणानिमित्त किराणा साहित्याचे करणार मोफत वितरण!!

सदैव सर्वांच्या सोबत हे सहकारातील ब्रिद वाक्य तंतोतंत जपत केवळ नफा कमावणे हाच उद्देश न ठेवता सामाजिक भान ठेवून भैरवनाथ पतसंस्थेने नेहमीच सामजिक उपक्रम राबवत सर्वसामान्य लोकांना कायम मदतीचा हात पुढे केला आहे.याच उपक्रमानुसार भैरवनाथने गरीब आणि गरजू लोकांसाठी मदत देऊ केली आहे.अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त १२०० अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांना मदत म्हणून दिवाळी सणानिमित्त भैरवनाथ पतसंस्थेच्या वतीने मोफत किराणा बाजार दिला जाणार असल्याची महिती भैरवनाथ पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, शिरूर लोकसभा मतदार संघाचे प्रथम खासदार श्री.शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज लांडेवाडी येथील जनता दरबारात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात दिली.

याप्रसंगी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, संचालक योगेश बाणखेले, महेश ढमढेरे, भिकाजी बोकड, अशोक गव्हाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी किसन भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे, साकोरे गावचे सरपंच अशोक मोढवे, लांडेवाडी गावचे सरपंच अंकुश लांडे, वडगाव काशिंबेग गावचे सरपंच वैभव पोखरकर, वाळुंजवाडी गावचे सरपंच नवनाथ वाळुंज आदी उपस्थित होते.

श्री भैरवनाथ पतसंस्थेने संकटकाळात नेहमीच सर्वसामान्य लोकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस अनेक ठिकाणी मदत देऊ केली आहे. कोरोना काळात जीवनउपयोगी वस्तू तसेच वैद्यकीय साहित्य पुरवण्यात आले होते.सध्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पतसंस्थेच्या वतीने शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार बाराशे शेतकऱ्यांना मदत देणार आहोत अशी महिती ही आढळराव पाटील यांनी या प्रसंगी दिली. पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.