आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथे पारंपरिक पद्धतीने साजरा झाला दसरा,वयाच्या ७७ व्या पुजारी गणपत मंचरे वर्षी कंबरेला दोरी बांधून ओढल्या मानाच्या १२ गाड्या!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडी गावात पारंपरिक पद्धतीने दसरा सण साजरा करण्यात आला.यावेळी बिरोबा देवाचे पुजारी श्री. गणपत मंचरे यांनी वयाच्या ७७ व्या वर्षी कमरेला दोरी बांधून १२ मानाच्या गाड्या ओढल्या. हा सोहळा पाहण्यासाठी स्थानिकांसह पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

नुकताच संपूर्ण देशात नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रास दांडियाच्या तालावर अबाल वृद्ध थिरकले. जारकरवाडी गाव मात्र याला अपवाद ठरले.

default

जारकरवाडी गेली अनेक वर्षे बिरोबा महाराजांचा उत्सव नवरात्र महोत्सवाच्या रूपात साजरा केला जातो. आधुनिक नवरात्रीला फाटा देत गावातील ज्येष्ठ व तरुण सहकाऱ्यांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने हा उत्सव संपन्न करत असतात. एकविसाव्या शतकात जिथे आधुनिक तंत्रज्ञान प्रगत होत आहे.मात्र काळाच्या ओघात काही गोष्टी मागे पडत आहेत.हाच धागा पकडून जारकरवाडी ग्रामस्थानी सामाजिक, धार्मिक प्रबोधन करण्यासाठी विविध महाराजांच्या श्रवणीय वाणीतून अखंड १० दिवस कीर्तन सेवा संपन्न केल्या.अध्यात्म आणि विज्ञान यांचा मेळ घालत पारंपरिक पद्धतीने दसरा सण साजरा केला.

यावेळी अखंड १० दिवस महाआरती, महाप्रसाद, रोज रात्री सर्वाक्ष धनगरी ओव्या, दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी गजी नृत्य सादर केले.तसेच दसऱ्याच्या दिवशी मयूर सरडे व प्रतीक्षा भांड यांनी सर्व महिला भगिनींसाठी जागर स्त्री शक्तीचा अभिमान महिला वर्गाचा या उपक्रमा अंतर्गत खेळ रंगला पैठणीचा अर्थात मीच होणार होम मिनिस्टर हा कार्यक्रम संपन्न झाला. दसऱ्याच्या दिवशी सर्व भाविकांच्या उपस्थितीत देवाची आरती संपन्न होऊन उपस्थित सर्वांना अन्न प्रसादाचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक दौलतभाई लोखंडे,संचालक रामचंद्र ढोबळे,मा. संचालक,उद्योजक रमेशशेठ लबडे, पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्षा ॲड.रुपालीताई भोजने, जारकरवाडी गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रतीक्षा बढेकर, उपसरपंच सचिन टाव्हरे, उपसरपंच सुवर्णा भांड, मा.उपसरपंच कौसल्या भोजने, उपनिरीक्षक गंधारे साहेब,शिवसेना जिल्हा अध्यक्ष सुरेश भोर, आंबेगाव तालुका भाजपा अध्यक्ष किरण वाळुंज, राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव तालुका महिला अध्यक्ष पूजा वळसे,शिवसेना संघटक सुरेखा निघोट,समर्थ क्रॉपचे उद्योजक रामहरी देवडे, उद्योजक दत्‍तारामशेठ वैद्य, चेअरमन खंडू भोजने उपस्थित होते.

संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन ग्रामविकास अधिकारी कचरदास भोजने, अभियंता उत्तम मंचरे, मा.उपसरपंच रविंद्र भांड,सचिव नवनाथ मंचरे, अविनाश तागड, दीपक पाचपुते, मंगेश भोसले,सत्यवान भोसले,अविनाश पवार, एकनाथ मच्छिंद्र भांड, गोरक्षनाथ भांड, पोपट आप्पा भोजने, प्रमोद पाचपुते व गावातील सर्व तरुणांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.सरपंच निवृत्ती भांड, उद्योजक भागाची भांड, प्रतीक्षा भांड यांनी केले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.