राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचालित न्यू इंग्लिश स्कूल,लाखणगाव शाळेत ५१ विद्यार्थ्यांना सायकल वाटप , शासकीय सेवेतील भूमिपुत्रांचा सन्मान,गुणवंत विद्यार्थी- आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा संपन्न!!


पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी – राष्ट्रीय ग्रामीण विकास केंद्र संचालित न्यू इंग्लिश स्कूल,लाखणगाव शाळेत ५१ विद्यार्थ्यांना सायकल वाटप , शासकीय सेवेतील भूमिपुत्रांचा सन्मान,गुणवंत विद्यार्थी- आदर्श शिक्षक गुणगौरव सोहळा कार्यक्रम आज बुधवार दि. 01/10/2025 रोजी लाखणगाव येथे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन प्रदिपदादा वळसे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिरूर पंचायत समितीचे मा.सभापती बाळशिराम ढोमे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
मा.प्रदिप दादा वळसे पाटील यांनी शाळेमध्ये “सायकल बँक ‘ ही योजना राबवण्याचे आवाहन करून स्वतः ५ सायकल दिल्या, त्यास प्रतिसाद देत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नवनाथ गाडगे व मुख्याध्यापक अनिल देसले यांनी स्थानिक पदाधिकारी ग्रामस्थ यांच्याशी संपर्क साधून ५१ जमा करून आज सायकलचे वाटप आज दादांच्या हस्ते संपन्न झाले.
त्याचबरोबर लाखणगाव मधील शासकीय सेवेतील 9 भूमिपुत्रांचा सत्कार व शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा व शाळेचा सत्कार संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी पारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे मा.अध्यक्ष अनिल वाळुंज, पंचायत समिती आंबेगावच्या गटशिक्षणाधिकारी रूपाली धोका, शिक्षण विस्तार अधिकारी कल्पना टाकळकर, केंद्रप्रमुख मच्छिंद्र काळे, आंबेगाव तालुका शेतमाल प्रक्रिया संघाचे अध्यक्ष सतीश रोडे पाटील, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक मनोजकुमार रोडे पाटील, काठापुर सरपंच भाऊसाहेब आवटी, सुप्रसिद्ध निवेदक निलेश पडवळ, लोकनियुक्त सरपंच प्राजक्ता रोडे पाटील, चेअरमन अनिल दौंड, ज्येष्ठ नेते लहूअण्णा पडवळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवनाथ गाडगे , उपाध्यक्ष प्रदीप रोडे, कोंडीबा नाथू रोडे, मा. प्राचार्य रामदास रोडे, माजी सरपंच नरेंद्र भागवत, मा. सरपंच दस्तगीर मुजावर, उपसरपंच दिपाली वाघमारे, वंदना पडवळ, साधना आरगडे, प्रमोद भागवत, सोमनाथ पोंदे, महेश भोजने, माऊली रोडे, नवनाथ पडवळ, पोपट बरकले, पोलीस पाटील कल्पना बोऱ्हाडे पा., सरपंच ज्ञानेश्वर पाबळे,योगेश पाटील,उदय मुंगसे,मनोहर घोलप,सुनिल जाधव अनेक पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी कल्पना राजगुरू, छाया वाघुंडे, रसिका शिंदे, अक्षय किर्वे यांचे सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक अनिल देसले सूत्रसंचालन प्रवीण शिकारे, सोमनाथ पोंदे, आभार प्रदर्शन महादेव कानसकर यांनी केले.

