आरोग्य व शिक्षणसामाजिक
वनविभागाच्या तत्परतेला सलाम!!

वनविभागाच्या तत्परतेला सलाम!!
धामणी (ता.आंबेगाव) येथील वनविभागाच्या हद्दीतील वरचा खंडोबा मंदिर परिसरातील डोंगराला भिषण आग लागली होती. अनेक वृक्ष, प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडुन निसर्गाची मोठी हानी झाली असती तत्काळ मा. सरपंच सागर जाधव, उपसरपंच अक्षयराजे विधाटे व प्रविण जाधव यांनी धामणी वनविभागाच्या अधिकारी सोनल भालेराव यांना संपर्क साधला.वन अधिकारी यांनी तत्परतेने वनरक्षक दिलीप वाघ यांना घटनेची कल्पना दिली व दिलीप वाघ यांनी रेस्क्यू टीम मधील कल्पेश बढेकर ,योगेश निघोट , सोनू लंके यांना सोबत घेऊन वरचा खंडोबा गाठला व हवा फवारणी यंत्र, झाडाचा पाला, ओले बाडदान यांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले .
वन विभागाने केलेल्या कामाचे परिसरातून कौतुक होत आहे.