आरोग्य व शिक्षणसामाजिक

लोणी (ता.आंबेगाव) येथील उपबाजारात बटाटा बियाणे दाखल!!

पंचनामा लोणी (धामणी)प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथे मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीचे लोणी उपबाजार आवारात मे.लक्ष्मी ट्रेडिंग कंपनीचे आडतदार मंगेश रोहिदास सोनवणे यांच्या आडत गाळ्यावर जालंधर येथुन मिलाफ फार्म (MF) या कंपनीच्या ज्योती बटाटा वाणाची आवक झाली आहे.बटाटा वाणाचे क्विंटलचे बाजारभाव १८००/- ते २२००/- रुपये आहे.

लोणी, शिरूर, खेड या तालूक्यातील व आजुबाजुचे परिसरातील शेतकऱ्यांनी बटाटा लागवडीसाठी लोणी उपबाजार आवारातील मंगेश सोनवणे यांचे आडत गाळ्यावर येऊन बटाटा वाणाची खरेदी करावी असे आवाहन मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निलेश थोरात यांनी केले आहे.

मान्सूनपुर्व पावसामुळे बटाटा लागवडीसाठी अनुकूल वातावरण असल्याची माहिती उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली.या संदर्भात वाळूंजनगर येथील बटाटा उत्पादक शेतकरी बाबाजी वाळूंज व मांदळेवाडी येथील बटाटा उत्पादक शेतकरी अप्पा मांदळे म्हणाले की, पूर्वी मंचर या ठिकाणी २५ ते ३० किलोमीटर लांब जाऊन बटाटा बियाने खरेदी करावे लागत होते.आता लोणी या ठिकाणी बटाटे बियाने मिळत असल्याने वहातूकीचा खर्च वाचल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.

लोणी (ता.आंबेगाव ) येथील उपबाजार समितीत बटाटा बियाने दाखल

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.