निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा !!


पंचनामा निरगुडसर प्रतिनिधी – निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथे पंडित जवाहरलाल नेहरु माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात ५ जून जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात आला. विद्यालय व मॅजिक बस व नेस्ले हेल्दी किड्स यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.त्यामध्ये गावामध्ये पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली.त्या रॅलीतून गावकऱ्यांना वेग वेगळे संदेश देण्यात आले जसे की प्लॅस्टिकचा अतिवापर टाळा, झाडे जगवा पर्यावरण वाचावा, कापडी पिशव्यांचा वापर करा, झाडे लावा झाडे जगवा.
उपक्रमाचे संपूर्ण नियोजन प्राजक्ता इंदोरे, स्मिता वाळुंज यांनी व संस्थेचे प्रकल्प समन्वयक प्रविण थोरात, सुरेखा राक्षे ,रविंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली केले.
उपक्रम राबविण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मॅजिक बसचे प्रतिनिधी प्राजक्ता इंदोरे , स्मिता वाळुंज, महेश माळी , रविंद्र शेळके आदींनी परिश्रम घेतले.

निरगुडसर ( ता.आंबेगाव ) येथील विद्यालयाने पर्यावरण जनजागृती प्रभात फेरी काढली.

