आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीसामाजिक

प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती आनंद समाधान प्राप्त करून देण्यासाठीच या मेळ्याचे आयोजन–ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी

ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जय भवानी रोड येथे एकाच छताखाली भारतभर पसरलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन!!

प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती आनंद समाधान प्राप्त करून देण्यासाठीच या मेळ्याचे आयोजन–ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी

ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे जय भवानी रोड येथे एकाच छताखाली भारतभर पसरलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन!!

नाशिक (प्रतिनिधी)-आपल्या जीवनात, विचारांमध्ये, संस्कारांमध्ये, परिवर्तन घडवून आणने, जीवनाप्रती आपला सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे, प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती आनंद समाधान प्राप्त करून देणे हा उद्देश समोर ठेवून महाशिवरात्री निमित्त या द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन व आध्यात्मिक मेळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाशिवरात्रीच्या रूपाने आपण भगवंताचा एक प्रकारे जन्मदिवस साजरा करत असतो. भगवंताच्या दिव्यअवतरणाने भूतलावर कसा प्रकाश पसरतो याचेच दर्शन या आध्यात्मिक द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळ्यामधून आपल्याला करण्यात् येईल. तुळजाभवानी मंदिराच्या या पावन प्राणांगणात लावलेल्या या अध्यात्मिक मेळ्यातुन सर्व जनता एकाच छताखाली भारतभर पसरलेल्या बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन प्राप्त करून आपल्यासाठी एक आध्यात्मिक ज्ञानप्रकाश प्राप्त करतील असे प्रतिपादन राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयाच्या नाशिक रोड सेवा केंद्रातर्फे दिनांक 23 ते 27 फेब्रुवारी पर्यंत जय भवानी रोड येथील तुळजाभवानी मंदिरात महाशिवरात्री निमित्त द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळा व राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आध्यात्मिक मेळ्याच्या उद्घाटन प्रसंगी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी बोलत होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन व शिव ध्वजारोहण करून करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. नगरसेवक रमेश धोंगडे, मा. नगरसेविका ज्योतीताई खोले, तुळजाभवानी मंदिर सचिव सुभाष पाटोळे, उपाध्यक्ष रमेश थोरात, खजिनदार रवींद्र गायकवाड, सहसचिव कैलास कदम, ट्रस्टी शिवाजी कदम, पोपट पाटोळे, शिवाजी लवटे व नगरसेविका कोमल मेहलोरिया यांच्या आई सुलभा मेहलोरिया, नाशिक रोड सेवा केंद्राच्या ब्रह्माकुमारी शक्ती दिदी व ब्रह्माकुमारी गोदावरी दिदि आदी मान्यवर उपस्थित होते.


दीदींनी पुढे सांगितले की या विद्यालयात साप्ताहिक कोर्स दिला जातो. यात आपल्याला आत्मा परमात्मा व विश्व चक्राचे ज्ञान दिले जाते. संसार कसा चालतो आज मनुष्य ची स्थिती अशी का आहे. मनुष्याचे जीवनमान इतके हालाखीचे का झालेले आहे, या दृष्ट चक्रापासून आपल्याला कसे मुक्त होता येईल या सर्व बाबी साप्ताहिक कोर्स मधून आपल्याला सांगण्यात येतील. या कोर्स मधून व्यक्तीचे जीवन परिवर्तन होऊन जीवनात सुख शांती आनंद लाभतो. त्यामुळे प्रत्येकाने हा निःशुल्क साप्ताहिक कोर्स आवर्जून करावा असे आवाहन याप्रसंगी आदरणीय ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मान्यवरांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुमारी खुशी हिने स्वागत नृत्य प्रस्तुत करत प्रेक्षकांची वाहवा मिळवली. ब्रह्माकुमारी ज्योती दीदी व ब्रह्माकुमारी वंदना जाधव यांनी पाहुण्याचे स्वागत पुष्प गुच्छ देऊन केले. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन ब्रह्माकुमार नरेंद्रभाई यांनी केले. ब्रह्माकुमार महेंद्र भाई यांनी पाहुण्यांना द्वादश ज्योतिर्लिंग व प्रदर्शनीची माहिती सांगितली. सर्व मान्यवरांना आदरणीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सत्कारित करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य व परिसरातील नागरिक उपस्थित होते. सर्वांनी द्वादश ज्योतिर्लिंगाचे व येथे लावण्यात आलेल्या अध्यात्मिक प्रदर्शनीचे अवलोकन करून भगवंताचा संदेश प्राप्त केला. हा अध्यात्मिक मेळावा याच ठिकाणी 27 फेब्रुवारी पर्यंत सकाळी 7 ते 9 नऊ खंड चालू राहील, सोबतच या मेळाव्यात निःशुल्क राजयोग शिबिर घेण्यात येणार आहे. सकाळी किंवा संध्याकाळी फक्त एक तास या ठिकाणी येऊन या मेडिटेशनचा लाभ सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्रह्मकुमारी शक्ती दीदी ब्रह्मकुमारी गोदावरी दीदी यांनी याप्रसंगी केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.