न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडीचा विद्यार्थी शंभुराजे योगेश बाणखेले याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उत्तुंग कामगिरी!!
३०० मीटर शर्यतीत द्वितीय क्रमांक!!

न्यू इंग्लिश स्कूल लांडेवाडीचा विद्यार्थी शंभुराजे योगेश बाणखेले याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेत उत्तुंग कामगिरी!!
३०० मीटर शर्यतीत द्वितीय क्रमांक!!
ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्र राज्यस्तरीय सबज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन दिनांक २३ फेब्रुवारी २०२५ रोजी पंढरपूर येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये राज्यभरातून १६०० हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या चुरशीच्या स्पर्धेत पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत न्यू इंग्लिश स्कूल, लांडेवाडीचा विद्यार्थी शंभुराजे योगेश बाणखेले याने उज्ज्वल कामगिरी केली आहे.
शंभुराजे याने १२ वर्षे वयोगटात ३०० मीटर धावण्याच्या प्रकारात द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले. शंभुराजेच्या यशामागे त्याच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे मोठे योगदान आहे. त्याला शिक्षक देवा मटाले यांनी मार्गदर्शन केले.
त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक व पुणे म्हाडाचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रा. शामल चौधरी, न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या शबनम मोमीन, उपप्राचार्या रजनी बाणखेले यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.