आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शिरदाळे(ता.आंबेगाव) ग्रामपंचायतच्या वतीने मा.सहकारमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पा.यांना त्वरित पाणी उपलब्ध होण्यासंदर्भात निवेदन!!

तळ्याचे खोलीकरण करून घ्या निधी मी उपलब्ध करतो - मा.वळसे पाटील

शिरदाळे(ता.आंबेगाव) ग्रामपंचायतच्या वतीने मा.सहकारमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पा.यांना त्वरित पाणी उपलब्ध होण्यासंदर्भात निवेदन!!

तळ्याचे खोलीकरण करून घ्या निधी मी उपलब्ध करतो:-मा.वळसे पाटील

शिरदाळे ता.आंबेगाव येथील पाण्याची समस्या गंभीर झाली असून साठवणुकीचे पाणी तळ्यात असल्याने आणि त्याचे प्रमाण कमी कमी होत चालल्याने पाणी जास्त प्रमाणात खराब झाले आहे.शिवाय वापरासाठी ज्या विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो ते पाणी देखील वापरायोग्य नाही.त्यामुळे ग्रामपंचायतच्या माध्यमातून नुकतेच वर्तमानपत्राद्वारे पाण्याची व्यवस्था होण्याबाबद माहिती दिली होती.त्याची दखल घेत तालुका पाणी पुरवठा अधिकारी मा.भंडारी साहेब आणि त्यांच्या टीमने शिरदाळे येथे भेट देऊन पाण्याची पाहणी केली होती.तसेच शुद्ध पाणी सुविधा असणाऱ्या फिल्टर मशीनची देखील पाहणी केली होती. त्यांनी देखील पाणी खराब असल्याचे सांगितले होते.


त्यानंतर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच श्री.मनोजशेठ तांबे,श्री.गणेशशेठ तांबे,मा.उपसरपंच श्री.मयुर सरडे,सोसायटी संचालक श्री.जयदीप चौधरी यांनी मा.सहकारमंत्री मा.ना.दिलीपराव वळसे पाटील यांची भेट घेऊन त्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच पाण्याची समस्या खूप गंभीर असून त्यामुळे ग्रामस्थ आजारी पडण्याचे प्रमाण वाढले असून त्वरित काहीतरी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.यावेळी साहेबांनी त्वरित तालुका पाणीपुरवठा अधिकारी मा.श्री.भंडारी साहेब यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून शिरदाळे गावासाठी त्वरित टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या.

तसेच पाणी कमी झाल्यावर तळ्याचे खोलीकरण करण्याबाबद माहिती घेतली व पाणी पातळी कमी झाल्यावर तळ्याची खोलीकरण करा त्यासाठी लागणारा निधी,JCB तसेच इतर यंत्रसामग्री मी उपलब्ध करून देतो असे साहेबांनी सांगितले. ग्रामपंचायत तसेच ग्रामस्थांच्या सहकार्याने तळ्याचे खोलीकरण करून घेण्याच्या सूचना साहेबांनी केल्या.त्यामुळे सद्यस्थितीला पाण्याची समस्या मिटणार असून ग्रामस्थांना वापरासाठी चांगले पाणी मिळणार आहे.त्याचबरोबर सोबत शिरदाळे नवीन ग्रामपंचायत इमारतीचे अधुरे काम पूर्ण करण्यासाठी निधीच्या मागणीचे निवेदन साहेबांना देण्यात आले.त्यावर देखील लवकर निधी देण्यात येईल असे साहेबांनी सांगितले.तसेच लवकरच शिरदाळे येथे प्रत्यक्ष भेट देण्यासाठी येणार असल्याचे साहेबांनी सांगितले.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.