निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी) – निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पं.ज.नेहरू माध्यमिक व द.गो.वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी त्याच्या प्रतिमेला विद्यालयातील सर्व शिक्षकांच्या हस्ते पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे जेष्ठ प्रा.अरूण गोरडे व पर्यवेक्षक संतोष वळसे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली.विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांची महती सांगितली. साहित्यसम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कांताराम टाव्हरे यांनी केले. तर सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळाचे प्रमूख विनोद बारवकर यांनी केले.आभार विनायक जोशी यांनी मानले.



