ग्रामपंचायत जवळे (ता.आंबेगाव) येथे संपन्न झाले पेयजल समृद्ध गाव प्रशिक्षण !!


पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत जवळे या ठिकाणी पेयजल समृद्ध गाव प्रशिक्षण सर्व ग्राम,पाणीपुरवठा व स्वच्छता समिती सदस्याच्या क्षमता विकासासाठी यशवंतराव चव्हाण रिसर्च ऑफ सोशल सायन्स मुंबई व R.A.C.D सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट बेलापूर, असर इंडिया प्रकल्प दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने वीस तासांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये आदर्श सरपंच सौ.वृषालीताई शिंदे पाटील, सौ.मनीषा टाव्हरे (उपसरपंच) चंद्रकला गायकवाड, संगीता साबळे,प्रमिला गावडे,शुभांगी खालकर,दत्तात्रय लायगुडे,हरिचंद्र शिंदे,अमोल वाळुंज,भूपेंद्र वाळुंज,अशोक लोखंडे,शालन सोनवणे (अंगणवाडी सेविका) सुरेखा खालकर,संध्या वाळुंज ,वैशाली वायकर, गोरक्षनाथ लायगुडे, महादेव शिंदे,R.A.C.D चे जिल्हा समन्वयक लताताई मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण संपन्न झाले.

यामध्ये गावातील पाणीपुरवठा व स्वच्छता समिती यांनी कशाप्रकारे पाणी पुरवठ्यासाठी काम करावे?गावातील पाणी समस्यांवरती कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने माहिती सादर करण्यात आली.

यावेळी सरपंच यांनी गावांमध्ये केंद्रशासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या जल जीवन मिशन चा आवर्जून उल्लेख केला.यातून सर्व गावासाठी स्वच्छ व शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी सर्व उपाययोजना करून गावासाठी पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर सफल झाल्याचे सांगण्यात आले.सर्वांचे ग्रामविकास अधिकारी शीला साबळे यांनी आभार मानले.