आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल अभियांत्रिकीच्या विध्यार्थीचा निरोप समारंभ उत्सहात संपन्न !!


पंचनामा शहापूर प्रतिनिधी – शहापूर येथील मोहिली- अघईतील विश्वात्मक जंगली महाराज ट्रस्ट (कोकमठाण) संचलित,आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकी विभागातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ यशस्वीरित्या उत्सहात संपन्न झाला.
परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलीच्या कृपाआशिर्वादाने व संत परिवाराच्या प्रेरणेतून व संस्थेचे अध्यक्ष श्री नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब व संकूलाचे कार्यध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांचे मार्गदर्शनाने प्राचार्य, डॉ. डी. डी. शिंदे सर,प्रा. गोविंद चव्हाण सर आणि प्रा. सूर्यकांत सी. नवले सर यांच्याद्वारे निरोप समारंभ आयोजित करण्यास आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात होणाऱ्या ऍक्टिव्हिटी, करियर मार्गदर्शन, प्रशिक्षण शिबिर, जॉब प्लेसमेंट अशा विविध प्रक्रिया संस्थेमार्फत घेण्यात येत असतात. यांचा लाभ विद्यार्थ्यांना होतो. याबद्दल विद्यार्थ्यांनी संस्थेचे आभार मानले.तसेच या कार्यक्रम वेळी प्राचार्य डी. डी. शिंदे यांनी विद्यार्थ्यांना भविष्यात अभियंत्रकी क्षेत्रात होणारे अमूलअग्र बद्दल याबद्दल माहिती दिली. तसेच उपस्थितीतानी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या.डॉ. एस. एन. अभिषेक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले याकार्यक्रमासाठी प्रा. स्वाती भोईर,प्रा.नरेश शेंडे,डॉ.स्वरूपा वाघ, प्रा.अमित निंबेकर, प्रा.ओंकार सांबरे सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.


