आरोग्य व शिक्षण

धामणी(ता. आंबेगाव) येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

धामणी गावात ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा !!

धामणी गावातील जि. प. शाळा, श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि कॉलेज, शिवतीर्थ पतसंस्था, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. धामणी ग्रामपंचायत च्या मुख्य चौकामध्ये सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याचप्रमाणे अंगणवाडी, जि. प. शाळा येथील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला.

विशेषतः अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांची गाणी त्यांचे नृत्य पाहुन ग्रामस्थांनी अंगणवाडी सेविका यांचे विशेष कौतुक केले. अंगणवाडी च्या सेविका महेश्वरी आळेकर मॅडम यांनी अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांना खुप चांगल्या प्रकारचे दर्जेदार शिक्षण देऊन ग्रामस्थांचे मन जिंकले आहे.

आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत चौकात साजरा झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांची खुप आकर्षक अशी मराठी गाणी बसवुन ती सादर केली गेली त्यांचे सादरीकरण पाहुन ग्रामस्थांच्या वतीने पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, सरपंच रेश्माताई बोऱ्हाडे, उपसरपंच संतोष करंजखेले, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते “धामणी भुषण” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
त्याचप्रमाणे जि. प.शाळेच्या विद्यार्थ्यांनी नृत्य व देशभक्तीपर भाषणे केली. श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि कॉलेज च्या विद्यार्थ्यांची इंग्लिश व मराठी मध्ये देशभक्तीपर व छत्रपती शिवाजी महाराज यांचे महत्व सांगणारी भाषणे झाली त्या सर्वाना ग्रामस्थांनी उत्तम दाद दिली. लवकरच जि. प. शाळा व श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि कॉलेज यांचे वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे अशी माहिती मुख्याध्यापक व प्राचार्यांनी दिली.

धामणी ग्रामपंचायत च्या वतीने श्री शिवाजी विद्यालय व ज्युनि कॉलेज च्या विवीध स्पर्धा परिक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करुन सत्कार करण्यात आला.
त्याप्रसंगी धामणी ग्रामस्थ व आजी माजी सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.