आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजन

निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप!!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात बसवलेल्या श्री गणेशाचे सातव्याव दिवशी (दि.०२) रोजी वाजत, गाजत ढोल ताशाच्या गजरात विसर्जन मिरवणूक संपन्न झाली. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीपथकाचे विविध खेळाने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक या विद्यालयात गेल्या अनेक वर्षापासून गणपती बाप्पा स्थापन केला जातो. सात दिवस विद्यालयात भक्तिमय वातावरणात गणेशाची आरती करून प्रसाद वाटप केले जाते. त्यानंतर सातव्या दिवशी गणेशाची ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत गावातून विसर्जन मिरवणूक काढली जाते. तसेच मिरवणूकीत आळंदी येथील मुलांनी ” रामकृष्ण हरी, गणपती बाप्पा मोरया ” हा जयघोष करून ग्रामस्थांचे लक्ष वेधले.

यावेळी गावतील सुद्धा अनेक घरगुती गणपतीचे विर्सजन केले जाते.यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ यांनी गणरायाची विसर्जन मिरवणूक काढत गणरायाला निरोप दिला. यावेळी ” गणपती बाप्पा मोरया ,” मंगलमूर्ती मोरया, गणपती गेले गावाला चैन पडेल आम्हाला..” या घोषणा देत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गणरायाला निरोप दिला.

यावेळी मा.सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,जेष्ठ नेते प्रतापराव वळसे पाटील,किरणताई वळसे पाटील, पूर्वा वळसे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्याक्ष विवेक वळसे पाटील,संस्थेचे अध्यक्ष ॲड.प्रदीप वळसे पाटील, सचिव प्रकाश तापकीर,माजी सरपंच फकिरा वळसे पाटील,रविंद्र करंजखेले,संतोष टाव्हरे,उद्योजक रामदास थोरात, नितीन टाव्हरे, उदय हांडे, सुरेश आवारी,संदिप टेमकर,रवी गायकवाड,प्राचार्य कांताराम टाव्हरे,पर्यवेक्षक संतोष वळसे,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, गावातील ग्रामस्थ , महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निरगुडसर (ता.आंबेगाव ) येथील विद्यालयातील ढोल ताशाच्या गजरात निघालेली गणरायाची मिरवणूक

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.