आरोग्य व शिक्षणसामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती उत्साहात संपन्न!!

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची २३४ वी जयंती पारगाव (शिंगवे) येथील अष्टविनायक महामार्ग चौकात राजे उमाजी नाईक यांच्या फलकाचे पूजन करून साजरी करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील पहिले आद्य क्रांतिवीर उमाजीराजे नाईक यांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करून उठाव केला.सलग चौदा वर्ष इंग्रज सत्तेविरुद्ध लढा उभारला आणि त्यांना सळो की पळो करून सोडले होते असे प्रतिपादन राजे उमाजी नाईक महिला बचत गटाच्या अध्यक्षा वर्षा रोडे यांनी केले.

पुणे जिल्हा विभाग प्रवक्ते नंदकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पारगाव या ठिकाणी राजे उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी प्रतिमा पुजन बाबुराव ढोबळे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच श्वेता ढोबळे,मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे,ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब ढोबळे,काळुराम लोखंडे,प्रगतशील शेतकरी अनिल ढोबळे,संजय बढेकर,बजरंग देवडे,रंगनाथ चव्हाण,उमाजी नाईक महिला बचत गटाच्या वर्षा रोडे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विवेक चव्हाण,उल्हास चव्हाण,नामदेव रोडे, राहुल गफले,जयवंत रोडे,स्वप्नील चव्हाण,रामदास रोडे,बाबाजी चव्हाण,संतोष चव्हाण,संजय मुसुडगे,गौरी ढोबळे,शंकर देवडे,सायली रोडे,सोनाली रोडे,शारदा मुसुडगे,ललित चव्हाण,इंद्रायणी चव्हाण,नितीन ढोबळे,शिवाजी ढोबळे तसेच राजे उमाजी नाईक महिला बचत गटाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.

जयंतीच्या निमित्ताने पारगाव येथील रामोशी समाजाकडून राजे उमाजी नाईक यांच्या फलकाकरीता बांधकाम ओट्याची पारगाव ग्रामपंचायतीकडे मागणी करण्यात आली. सर्वांनी राजे उमाजी नाईक यांच्या घोषणा देऊन येळकोट येळकोट जय मल्हार अशा घोषणा दिल्या.

Chief Editor

Related Articles

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.