समर्थ आयटीआय मध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभ
विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्यातून स्वतःला सिद्ध करावे - शरद देशमुख
समर्थ आयटीआय मध्ये विद्यार्थी गुणगौरव समारंभ
विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्यातून स्वतःला सिद्ध करावे :शरद देशमुख
आखिल भारतीय व्यवसाय परिषद (ए आय टी टी) नवी दिल्ली अंतर्गत घेण्यात आलेल्या जुलै/ऑगस्ट २०२४ परीक्षेमध्ये समर्थ औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय टी आय) बेल्हे येथील विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करत उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याची माहिती प्राचार्य पांडुरंग हाडवळे व उपप्रचार्य विष्णू मापारी यांनी सांगितले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी परिवहन अधिकारी शरद देशमुख व मुंबई पोर्ट ट्रस्ट गोदी विभागाचे निवृत्त अधिकारी बबन हाडवळे उपस्थित होते.
शरद देशमुख विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आयटीआय हा अभ्यासक्रम कौशल्याधिष्ठित असून विद्यार्थ्यांनी नवनवीन कौशल्य हस्तगत करून स्वतःला सिद्ध करायला हवे.संधी अनेक उपलब्ध आहेत.त्या संधीचे सोने करण्यासाठी स्वतःला सिद्ध करणे गरजेचे आहे.
बबन हाडवळे म्हणाले की,आपले आई-वडील गुरु यांची इच्छापूर्ती करण्यासाठी आदरयुक्त भावनेतून प्रत्येक कामामध्ये निष्ठा ठेवून तत्परतेने केल्यास यश हमखास मिळतेच. प्रयत्नांची पराकाष्टा करून आपल्याला हवे ते यश मिळवण्याचा प्रयत्न करावा.
विविध शाखांचे निकाल पुढीलप्रमाणे:
प्रवेश सत्र २०२२-२०२४
ड्राफ्टसमन मेकॅनिकल
प्रथम क्रमांक-अश्विन राऊत-८६.६७%
द्वितीय क्रमांक-अभिषेक जूदरे-८५.००%
तृतीय क्रमांक-संकेत बटवाल-८२.१७%
इलेक्ट्रिशीयन
प्रथम क्रमांक-आर्यन विश्वासराव-८४.१७%
द्वितीय क्रमांक-रोहन भाकरे-८३.३३%
तृतीय क्रमांक-आयुष वाघुले-८१.००%
फिटर
प्रथम क्रमांक-अजित माळवे-८५.१७%
द्वितीय क्रमांक-सुयश शिंदे-८२.३३%
तृतीय क्रमांक-दया गुंड-८०.१७%
मेकॅनिकल मोटार व्हेईकल
प्रथम क्रमांक-सार्थक सालके ८३.६७%
द्वितीय क्रमांक-अनिकेत उंडे-८२.६७%
तृतीय क्रमांक-आदित्य कानस्कर-८१.१७%
मेकॅनिकल रेफ्रिजरेशन अँड एसी
प्रथम क्रमांक-रोहित गायकवाड-८१.६७%
द्वितीय क्रमांक-प्रज्योत शिर्के-८०.५०%
तृतीय क्रमांक-फय्याज चौगुले-८०.३३%
प्रवेश सत्र २०२३-२४
कोपा
प्रथम क्रमांक-स्वराज जांभळे-८३.६७%
द्वितीय क्रमांक-सिद्धेश दातखिळे-७९.३३%
मेकॅनिक डिझेल
प्रथम क्रमांक-सिद्धनाथ गोरडे-८०.१७%
द्वितीय क्रमांक-विश्वास माने-७९.१७ %
तृतीय क्रमांक-सोयफ पटेल-७७.६७%
मेकॅनिक ट्रॅक्टर :-
प्रथम क्रमांक-भरत पादीर-७९.३३%
द्वितीय क्रमांक-अक्षय शिर्के-७९.३३%
तृतीय क्रमांक-कुणाल मापारी-७६.१७%
वेल्डर गॅस व वीज
प्रथम क्रमांक-यश आहेर-७९.३३%
द्वितीय क्रमांक-आवेज चौगुले-७६.१७%
तृतीय क्रमांक-विकास टाव्हरे-७५.६७%
प्रवेश सत्र २०२३-२५
ड्राफ्टसमन
प्रथम क्रमांक-कोमल औटी-८४.१७%
द्वितीय क्रमांक-निकिता काटे-८०.६७%
तृतीय क्रमांक-गौरव गुंड-७७.६७%
इलेक्ट्रिशियन
प्रथम क्रमांक-प्रसाद औटी-९२.५०%
द्वितीय क्रमांक-दमयंती अस्वार-८३.८३%
तृतीय क्रमांक-यश घोलप-८३.००%
फिटर
प्रथम क्रमांक-सुधीर नवले-८१.००%
द्वितीय क्रमांक-आकाश गाडेकर-८०.३३%
तृतीय क्रमांक-सचिन भाईक-७५.८३%
मेकॅनिक मोटार व्हेइकल
प्रथम क्रमांक-साहिल बांगर-८२.३३%
द्वितीय क्रमांक-अक्षय डुंबरे-८१.३३%
तृतीय क्रमांक-आकाश त्रीपाठी-८१.३३%
मेकॅनिक रेफ्रीजरेशन अँड एसी.
प्रथम क्रमांक-प्रज्वल थोरात-७९.००%
द्वितीय क्रमांक-ऋषिकेश सुपेकर -७७.१७%
तृतीय क्रमांक-शाहिद पटेल-७६.००%
सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल ताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,रिसर्च इनोवेशन अँड इंटरनॅशनलायझेशन सेलचे संचालक डॉ.प्रतीक मुणगेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू मापारी यांनी,सूत्रसंचालन प्रशांत औटी यांनी तर आभार प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी मानले.