समर्थ मधील जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत ८० संघाचा सहभाग!!
समर्थ मधील जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत ८० संघाचा सहभाग!!
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन व्हॉलीबॉल स्पर्धा २०२४ (मुले) नुकतीच समर्थ क्रीडा संकुलात संपन्न झाल्या.
स्पर्धेचे उदघाटन पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ.उमेश पणेरू यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजनाने करण्यात आले.यावेळी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती चे सहाय्यक सचिव डॉ.गौतम जाधव,डॉ. बढे, डॉ. चव्हाण,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,बीसीएस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,क्रीडा संचालक एच पी नरसुडे प्रशासकीय अधिकारी प्रदीप गाडेकर,क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.रविंद्र नवले,प्रा.निलेश नागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.उमेश पनेरु म्हणाले की,खेळ हा आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे.खेळामुळे शारीरिक त्याचबरोबर मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी मदत होते. चिंतामुक्त जीवन जगण्यासाठी खेळ हे अतिशय प्रभावी माध्यम आहे.समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये विविध प्रकारच्या क्रीडा कौशल्यांना वाव देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो ही गौरवास्पद बाब असल्याचे यावेळी डॉ.पनेरू म्हणाले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-
प्रथम क्रमांक- टी सी कॉलेज बारामती
द्वितीय क्रमांक-राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ,भोसरी
तृतीय क्रमांक- विद्या प्रतिष्ठान आर्ट कॉमर्स,सायन्स कॉलेज,बारामती
चतुर्थ क्रमांक- पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,निगडी
स्पर्धांचे यशस्वी संयोजन करण्यासाठी समर्थ शैक्षणिक संकुलाचे क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे,प्रा.सुरेश नवले,प्रा.निलेश नागरे,सुरेश काकडे,ज्ञानेश्वर जाधव यांचे सहकार्य मिळाले.
सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,रिसर्च इनोव्हेशन व इंटरनॅशनलाईजेशनचे संचालक डॉ.प्रतीक मुणगेकर,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले.