वाळुंजनगर-लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री कमळजादेवी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!!
वाळुंजनगर-लोणी (ता.आंबेगाव) येथे श्री कमळजादेवी उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन!!
वाळुंजनगर-लोणी (ता.आंबेगाव ) येथील ग्रामदैवत श्री कमळजादेवी उत्सवा निमित्त शुक्रवार (दि.०८) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पहाटे ४ ते ६ वाजता काकडा,सकाळी ६ ते ७ वाजता देवीस चोळीपातळ,हारतुरे व मांडव डहाळे,सकाळी ९ वाजता श्री सत्यनारायण महापूजा,दुपारी एक वाजता देवीची काठी मिरवणूक,दुपारी ३.३० ते ५.३० वाजता ह.भ.प साध्वी वैष्णवी सरस्वती-दिदी ( आळंदी देवाची) यांचा हरि किर्तनाचा कार्यक्रम होईल.
सायंकाळी ६ ते ९ वाजता महाप्रसाद,रात्री नऊ वाजता ह.भ.प संजय महाराज वाळुंज यांचे मार्गदर्शनाखाली स्वरतरंग भजन मंडळ वाळुंजनगर प्रसिद्ध गायिका मयुरी सोनवणे-अस्वारे (ओतूर) यांचा संगित भजनाचा कार्यक्रम होईल.
या उत्सवानिमित्त स्पर्धा परिक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच स्वर्गीय कृष्णाबाई भिकाजी वाळुंज यांच्या स्मरणार्थ आदर्श माता पुरस्कार देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमा निमित्त विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत राहाणार असल्याचे ग्रामस्थांनी एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन समस्थ ग्रामस्थ कमळजादेवी ग्रामविकास प्रतिष्ठान,समस्त ग्रामस्थ मंडळी वाळुंजनगर,पुणे,ठाणे,मुंबई,लोणीकंद मंडळीनी केले आहे.