लोणीच्या आठवडे बाजारात ग्राहकांनी फिरवली पाठ!!
लोणीच्या आठवडे बाजारात ग्राहकांनी फिरवली पाठ!!
लोणी (ता.आंबेगाव ) येथील बुधवार (दि.०६) आठवडे बाजारात सर्वच तरकारी मालाचे भाव कडाडल्याने ग्राहकांनी बाजारकडे पाठ फिरवली.दिवाळी सणासाच्या अगोदर मात्र येथील आठवडे बाजारात खरेदीसाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.मात्र दिवाळी संपली आणि शेतकरी आपल्या शेतातील कामाकडे वळला परिणामी आठवडे बाजारात गर्दी मात्र कमी झालेली दिसून आली.तसेच लोणी येथील बाजार पेठेत सुद्धा ग्राहकांचा शुकशुकाटच पाहायला मिळाला.कारण दिवाळी संपली की शेतकरी आपल्या शेतीच्या कामात गुंतलेला दिसतो.
आजच्या येथील आठवडे बाजारात सर्वच तरकारी मालाचे भाव मात्र कडाडले होते.या बाजाराचे वैशिष्टये म्हणजे आंबेगाव तालुक्यासह,खेड, शिरूर तालुक्यातील जवळ-जवळ तीस ते पस्तीस गावातील नागरीकांचा येथील आठवडे बाजाराजी संपर्क येतो.त्यामुळे येथील आठवडे बाजारात मोठी गर्दी असते.चालू वर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने पाणी मुबलक असल्याने यंदा शेतातील उत्पन्न चांगले मिळणार असल्याने शेतकरी आपल्या शेतीच्या कामात मग्न झालेला दिसतो.
विशेष म्हणजे कांदा ५० ते ६० रुपये किलो, बटाटा ४० ते ५० रुपये किलो, लसून २५० ते ३०० रुपये किलो,टोमॅटो ४० रूपये किलो,वांगी ८० ते १०० रुपये किलो, कारली ७० ते ८० रुपये किलो, भेंढी ६० रुपये किलो त्याच बरोबर आले, भोपळा,मेथी,धना,शापू व फळांचे भाव सुद्धा कडाडले होते.
लोणी (ता.आंबेगाव ) येथील आठवडे बाजारात ग्राहकांची गर्दी कमी दिसत होती.