लोणी(ता.आंबेगाव) उपबाजारात कांद्याला ५६० ते ६०१ रूपये भाव

लोणी उपबाजारात कांद्याला ५६० ते ६०१ रूपये भाव
लोणी-धामणी – मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या लोणी येथे उपबाजारात बुधवार (दि.०६) रोजी कांदे लिलावात भावात वाढ झाली असून सुपर गोळे कांद्याला दहा किलोस ६११ ते ६२५ रुपये भाव मिळाला अशी माहिती मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी दिली आहे. उपबाजार लोणी येथील कांद्याचे भाव प्रति दहा किलोस खालील प्रमाणे
एकूण आवक १०९५ पिशवी त्यापैकी गोळे कांदे २५ पिशवी-१ नंबर-६११ ते ६२५, सुपर गोळे कांदे-१ नंबर-५६० ते ६०१,सुपर मेडीयम कांदे २ नंबर-४७० ते ५५०,गोल्टी व गोल्टा कांदे ३ नंबर-३७० ते ४३०,बदला कांदे/चींगळी कांदे-४ नंबर-२२५ ते ३१० असा भाव मिळाला असून लोणी येथील उपबाजारात लिलावाचे दिवस सोमवार,बुधवार आणि शनिवार असून सकाळी १२.०० ते लिलाव होई पर्यंत लिलाव बोली सुरू असते असे उपसभापती सचिन पानसरे व संचालक मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
सध्या काद्यांच्या भावात चांगली वाढ होत असल्याने लोणी येथील उपबाजारात आंबेगाव तालुक्यासह खेड व शिरूर तालुक्यातील शेजारील गावातील कांदा उत्पादक शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणतात असे लोणी येथील कार्यालय प्रमूख अशोक राजापूरे यांनी सांगितले. तर यापुढे जरी काद्यांची आवक अशीच राहिली किंवा कमी झाली तरी कांदाचे भाव फार कमी न होता स्थिर राहतील असे कांद्याचे व्यापारी महेंद वाळुंज यांनी सांगितले.
लोणी (ता.आंबेगाव ) येथील उपबाजारात विक्रीसाठी आलेला कांदा