आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे मुख्याध्यापकपदी संजय जोरी यांची नियुक्ती!!

महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे मुख्याध्यापकपदी संजय जोरी यांची नियुक्ती!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

शिरुर तालुक्यातील जांबुत गावचे सुपुत्र संजय जोरी यांची महर्षी शिंदे हायस्कूल आंबळे ता.शिरूर या ठिकाणी मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली असुन त्या निमित्ताने जांबुत ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
जोरी यांच्या मार्गदर्शनामुळे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये २९ विद्यार्थीं शिष्यवृत्तीधारक,राज्य गुणवत्तायादी,जिल्हा गुणवत्ता यादीत यश संपादन केले.

इंग्रजी विषय शिकविण्यात जोरी तरबेज असुन यांचा हात कोणीही धरू शकत नाहीअसे माजी विद्यार्थी बोलत असतात. १९९८ जिल्हा गुणवंत पुरस्कार प्राप्त झाला.सन १९९७, १९९९ला शिरूर पंचायत समिती पुरस्कार, राज्यस्तरीय हुतात्मा पुरस्कार महाबळेश्वर येथे सन २००३ मध्ये मिळाला.जांबुत गावामध्ये ३१ वर्ष शिक्षक म्हणून काम केले.


मुलांच्या जडणघडणीत त्यांच्या भवितव्यात शिक्षक आणि शिक्षिकांचा मोठा अनमोल वाटा असतो, शिक्षक मुलांना घडवताना त्याची ज्ञान,बौद्धिक, शारीरिक व मानसिकता विचारात घेऊन शिक्षक मुलांना नुसतं पुस्तकी ज्ञान देत नाहीत तर घरी समाजात कसं रहायचं,कसं वागायचं, काय करायचं,काय करू नये याचा जीवनपट देतात. मुलांमधल्या गुप्त कलागुणांना बाहेर काढतात. त्या गुणांना खतपाणी घालून वाढवतात. विकसित करतात. भावी जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देतात. त्या चिमुकल्या पंखात गरुड भरारी घेण्याचं सामर्थ्य, शक्ती, बळ,आत्मविश्वास विद्यार्थ्यांनमध्ये घडवण्याचं काम जोरी सर यांनी केले.


या प्रसंगी पुढील वाटचालीस माजी आमदार पोपटराव गावडे, पुणे जिल्हा उपजिल्हाधिकारी रामदास जगताप,माजी पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे, माजी सरपंच जयश्री जगताप, माजी पंचायत समिती सदस्य वासुदेव जोरी, ग्रामपंचायत सदस्य राहुल जगताप,जय मल्हार हायस्कूल मुख्याध्यापक सुनील जाधव,पंढरीनाथ गाजरे , भानुदास पळसकर,शरद पळसकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या नियुक्तीमुळे शिक्षक कर्मचारी यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.