आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

विद्यार्थ्यांना एमबीए २०२४ च्या प्रवेशासाठी अखेरची संधी!!

आत्मा परीक्षा २०२४ चे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ जुलै..

विद्यार्थ्यांना एमबीए २०२४ च्या प्रवेशासाठी अखेरची संधी!!

आत्मा परीक्षा २०२४ चे ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ११ जुलै..

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट,बेल्हे (बांगरवाडी) या व्यवस्थापन शास्त्र (एम बी ए) महाविद्यालयामध्ये समुपदेशन केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना ऑनलाइन एप्लीकेशन फॉर्म भरणे,प्रवेशासाठी व शिष्यवृत्तीसाठी लागणारी विविध कागदपत्रे त्याचप्रमाणे विविध अभ्यासक्रम याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाते.
एमबीए,पीजीडीएम,एमसीए आणि एमएमएस यांसारख्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी सीईटीची परीक्षा देणे अनिवार्य असते.परंतु ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनाची सीईटी दिलेली नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शेवटची संधी म्हणून आत्मा ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणारी राष्ट्रीय स्तरावर स्वीकृत प्रवेश परीक्षा आहे,जी भारतातील सर्व राज्यांमध्ये प्रवेशयोग्य आहे.ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (AICTE) आणि भारत सरकारच्या HRD मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त आहे.ATMA व्यवस्थापन शिक्षणातील उत्कृष्टतेचा दाखला आहे.

शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये नुकतेच पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी,ज्यांनी महा-एमबीए /एमएमएस-सीईटी-२०२४ व इतर कोणतीही परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अखेरची संधी म्हणून ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे आत्मा परीक्षा २०२४” आयोजित करण्यात आल्याची माहिती एमबीए चे डॉ.महेश भास्कर यांनी दिली.

सदरची परीक्षा ही २१ जुलै २०२४ रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून त्यासाठी विद्यार्थी ११ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करू शकतो.त्यानंतर २८ जुलै रोजी निकाल जाहिर होईल.ही परीक्षा ऑनलाइन स्वरूपाची असणार आहे
आणि ही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षामध्ये एमबीए मध्ये रिक्त जागांवर प्रवेश निश्चित करण्याची संधी मिळणार आहे.

सदर परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना atmaaims.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तरी एमबीए या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीतच ऑनलाईन अर्ज भरावेत असे कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी सांगितले आहे.

एमबीए प्रवेशप्रक्रिया व अधिकच्या माहितीसाठी डॉ.महेश भास्कर-९७६६११७८७१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.