आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे कृषीविभागामार्फत शेतकर्यांना मुग बियाणे वाटप!!

मांदळेवाडी (ता.आंबेगाव) येथे कृषीविभागामार्फत शेतकर्यांना मुग बियाणे वाटप!!

प्रतिनिधी-समीर गोरडे

कृषि विभाग आंबेगाव अंतर्गत मौजे मांदळेवाडी येथे मा. तालुका कृषि अधिकारी श्री. नरेंद्र वेताळ व मंडळ कृषी अधिकारी सोपान लांडे यांचे मार्गदर्शनाखाली अन्न आणि पोषण सुरक्षा – कडधान्य अंतर्गत मुग पीक प्रात्यक्षिक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मूग पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवले व कृषि विभागाच्या विविध योजनांमध्ये महाडीबीटी अंतर्गत ट्रॅक्टर व अवजारे, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे, फळबाग लागवड इत्यादी बद्दल माहिती कृषि सहाय्यक आर. ए. केंगारे यांनी दिली व ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनही केले. यावेळी मांदळेवाडी गावचे सरपंच उज्वला आदक, ग्रामपंचायत सदस्य फकीरा आदक,पोलीस पाटील काळूराम पालेकर व शेतकरी उपस्थित होते.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.