आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वाटप!!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) येथे नवागतांचे स्वागत व मोफत पाठ्यपुस्तके वाटप!!

आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या जारकरवाडीच्या ढोबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागतांचे स्वागत करून विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढोबळेवाडी (जारकरवाडी) विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारी शाळा म्हणून ओळखली जाते. दप्तर विना शाळा,विद्यार्थ्यांसाठी आठवडे बाजार, परिसर अभ्यास, विविध स्पर्धा असे अनेक विविध उपक्रम शाळेमार्फत राबवले जातात.

यावेळी नवागतांचे औक्षण करण्यात आले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामचंद्र जयराम ढोबळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीपक काशिनाथ ढोबळे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सौ.भुतांबरे,सौ.वणवे, अंगणवाडी ताई निर्मला पाचपुते यांच्या हस्ते सर्व मुलांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच लाडू भरून तोंड गोड करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य,पालक,ग्रामस्थ महिला भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सर्व मुलांना घवघवीत यश मिळावे यासाठी शुभेच्छा दिल्या.

उपस्थितांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले. सहशिक्षिका वैजयंता विजय थोरात यांनी प्रास्ताविक केले तर मुख्याध्यापक श्री.विजय एकनाथ थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.