आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमांना परवानगी!!

आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमांना परवानगी!!

शहापुर- शहापुर तालुक्यातील मोहिली- अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकामठाण) संचलित, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलातील,मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (अम्रीत) या अभियांत्रिकी महाविद्यालयाला डिप्लोमा व डिग्री विभागात नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद(AICTE), नवी दिल्ली तर्फे परवानगी देण्यात आली आहे.

अभियांत्रिकी शाखेतील डिप्लोमा विभागात आय.टी.(IT) व ए.आय.एम.एल (AIML) अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग व डिग्री विभागात कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग (विथ आय. ओ. टी.,अर्थात इंटरनेट ऑफ थिंग्ज, सायबर सेक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉक चेन तंत्रज्ञान ) आणि ए.आय.एम.एल (AIML) अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सदर अभ्यासक्रमंसाठीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने(CAP ) राबवली जाणार आहे. डिग्री विभागातील अभ्यासक्रमांसाठी बारावी सायन्स शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत तसेच या विद्यार्थ्यांनी सी.ई.टी.(CET ) परीक्षा दिलेली असणे व केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर केलेला असणे आवश्यक आहे. डिप्लोमा विभागातील अभ्यासक्रमांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र आहेत तसेच या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेत अर्ज सादर केलेला असणे आवश्यक आहे. सदर विद्याशाखांचा अभ्यासक्रम हा सध्या कम्प्युटर क्षेत्रात नवीन असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित आहे व हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरीच्या व व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत असे संकुलाचे शैक्षणिक संचालक तथा प्राचार्य डॉ.डी.डी.शिंदे यांनी सांगितले.


सदर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जूनियर प्रोग्रॅमर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, वेब डिझायनर, सिस्टीम अनालिस्ट, सॉफ्टवेअर टेस्टिंग अँड क्वालिटी अशुरन्स, नेटवर्क इंजिनियर, टेक्निकल रायटर, सॉफ्टवेअर पब्लिशर्स, इन्फॉर्मेशन सिस्टीम मॅनेजर, डाटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स, चीफ इन्फॉर्मेशन ऑफिसर इत्यादी अनेक क्षेत्रांमध्ये नोकरी व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. अध्यात्मिकतेची जोड देऊन, नवीन तंत्रज्ञानात विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करून, त्यांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घेऊन, समाजाभिमुख अभियंते तयार करण्याचा संस्थेचा मानस आहे असे संकुलाचे कार्याध्यक्ष उमेश जाधव साहेब यांनी सांगितले.

हे नवीन अभ्यासक्रम सुरू झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी साहेब व सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे साहेब यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांनी नव्या शैक्षणिक प्रवाह बरोबर नवीन संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.

Chief Editor

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्युज पोर्टल च्या बातम्या,फोटो कॉपी करू नये.